Tuljapur News : बेकायदेशीर वीटभट्ट्यांविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आंदोलन

बेकायदेशीर भट्ट्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी
Tuljapur News |
Tuljapur News : बेकायदेशीर वीटभट्ट्यांविरोधात भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे आंदोलन Pudhari Photo
Published on
Updated on

तुळजापूर : तालुक्यातील बेकायदेशीर विटभट्ट्यांविरोधात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश महामंडळ लातूर येथे 14 ऑगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापुरकर यांच्या आदेशावरून व जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना, तसेच तहासिलदार महाराष्ट्र प्रदर्शन महामंडळ लातूर यांना वारंवार निवेदने देत, धरणे, रस्ता रोको अशा विविध मार्गांनी आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी शासन व प्रशासनाला तातडीने बेकायदेशीर भट्ट्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news