Tuljabhavani Temple : आई जगदंबे.. दुष्काळाचे संकट घालव

लाखों भाविकांची विश्वजननी तुळजाभवानी मातेकडे प्रार्थना
Tuljabhavani Temple
Tuljabhavani Temple
Published on: 
Updated on: 

संजय कुलकर्णी

तुळजापूर : संपूर्ण विश्वाची जननी आई तुळजा भवानी मातेचे सावळे, सुंदर रूप मनात साठवून महाराष्ट्रासह परराज्यांवर यंदा अपुऱ्या पावसामुळे ओढवलेले संकट परतवून लावण्याची प्रार्थना करीत नतमस्तक होणारा भाविक मातेकडे क्षमायाचना करताना दिसून आला. मोठ्या भक्ती आणि श्रध्देने लाखो भाविकांनी तुळजापूर नगरीत हजेरी लावून मातेचा कुलधर्म कुलाचार पार पाडला.

गेले दोन दिवस कन्नड आणि तेलगू भाषीक भक्तांच्या प्रचंड गर्दीने गजबजून गेलेल्या तुळजापूर नगरीत आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र महोत्सवातील दुसऱ्या माळेला भाविकांची गर्दी सामान्य दिसून येत आहे.आज सोमवारी दुसऱ्या माळेला कुलस्वामीनी श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिर परिसरासह देवीच्या गाभाऱ्याचे विविधरंगी फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. सदाबहार फुलांनी बहरून टाकणारा मंदिर परिसर प्रत्येक भाविकांच्या अंगी थकून भागून आलेला शीण दूर करीत मातेसमोर प्रसन्न वदनाने नतमस्तक होण्यासाठी जणू बळच देत होता. जो-तो आपल्या परीने देवीसमोर नतमस्तक होवून परतीचा प्रवास सुरू करीत आहे. मंदिर संस्थानने भक्तांसमोर दर्शनाचे अनेक पर्याय ठेवले आहेत.

देवीभक्त स:शुल्क देणगी दर्शन, किंवा रांगेतून दर्शन घेऊन आनंद व्यक्त करीत आहे. पेड दर्शनासाठी ३०० आणि १००० रुपये मोजण्याऐवजी दोन ते तीन तास रांगेत उभा टाकून धर्म आणि मुख दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल दिसत आहे. याशिवाय ऑनलाईन अभिषेक दर्शनाचे बुकिंग करून थेट मातेच्या गाभाऱ्यातून दर्शन घेण्यासाठीही भक्तांची धडपड सुरू आहे. सर्वपित्री अमावस्या ते घटस्थापना आणि आज दुसरी माळ या तीन दिवसांत किमान तीन ते चार लाखांवर भाविकांनी दर्शनासाठी तुळजापुरात हजेरी लावल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news