Paranda Illegal Liquor Seized | परंडा तालुक्यात गोवा बनावटीच्या मद्याचा ७.९२ लाखांचा साठा जप्त

चिंचपूर येथे तलावाशेजारील शेतात छापा; देशी दारू व व्हिस्कीचे १८४ बॉक्स हस्तगत
Excise Department Raid
चिंचपूर (बु.) येथे तलावाशेजारील शेतात लपवून ठेवलेला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केलाPudhari
Published on: 
Updated on: 

Excise Department Raid

भूम : परंडा तालुक्यातील चिंचपूर (बु.) येथे तलावाशेजारील शेतात लपवून ठेवलेला गोवा बनावटीच्या मद्याचा साठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून जप्त केला. या कारवाईत सात लाख ९२ हजार रुपये किमतीचे देशी दारू आणि व्हिस्कीचे एकूण १८४ बॉक्स हस्तगत करण्यात आले. या प्रकरणातील संबंधित आरोपी फरार असून, मद्यसाठा कोणी आणला, त्याचा पुरवठा कुठे केला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.

महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेल्या गोवा बनावटीच्या मद्याची साठवणूक केल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम येथील पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने चिंचपूर (बु.) येथील तलावाशेजारील शेतात छापा टाकला. या वेळी शेतात लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील मद्यसाठा आढळून आला. पथकाने हा संपूर्ण साठा जप्त केला.

Excise Department Raid
Paranda Dog Attack | जनगणना कर्मचाऱ्यावर कुत्र्यांचा हल्ला; बचाव करताना पडल्‍याने पाय ‘फ्रॅक्‍चर’

हजारो सीलबंद बाटल्या हस्तगत

जप्त केलेल्या मद्यसाठ्यात ९० मिलिलिटर क्षमतेच्या देशी दारूच्या १७ हजार ७०० सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे. या बाटल्या १७७ बॉक्समध्ये ठेवण्यात आल्या होत्या. याशिवाय १८० मिलिलिटर क्षमतेच्या व्हिस्कीच्या ३३६ बाटल्या, म्हणजेच सात बॉक्स जप्त करण्यात आले. या संपूर्ण मद्यसाठ्याची किंमत सात लाख ९२ हजार रुपये असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सांगितले.

मद्यसाठ्याचा मालक कोण?

शेतात एवढ्या मोठ्या प्रमाणात मद्यसाठा कोणी आणून ठेवला, त्याची वाहतूक कोणी केली आणि त्याचा पुरवठा कोणाला केला जाणार होता, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. मद्याचा स्रोत आणि या प्रकरणातील संभाव्य सहभागींचा शोध विभागाकडून घेतला जात आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

Excise Department Raid
Paranda Encroachment Action : परंड्यातील अतिक्रमणांवर नगर परिषदेचा हातोडा

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाराशिवचे अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत भूमचे निरीक्षक एच. बी. लांडे, दुय्यम निरीक्षक बी. ए. राख व वाय. ए. कस्तुरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. कोरे तसेच जवान ए. एन. कोळी, ए. एच. गवारी आणि आर. आर. कदम यांनी सहभाग घेतला. पुढील तपास दुय्यम निरीक्षक बी. ए. राख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news