Dharashiv News : धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उजनीतून देण्याचे निर्देश

करजखेडा येथील पाहणीदरम्यान आमदार पाटील यांनी पूर्णतः कोरडा पडलेला पाटबंधारे तलाव दाखवत जिल्ह्यातील पाण्याची गंभीर परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
Dharashiv News : धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उजनीतून देण्याचे निर्देश
धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उजनीतून देण्याचे निर्देशfile photo
Published on: 
Updated on: 

Directives issued to release 1 TMC of water from Ujani for Dharashiv

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी उजनी धरणातून धाराशिव जिल्ह्यासाठी एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. २३ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली.

Dharashiv News : धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उजनीतून देण्याचे निर्देश
Dharashiv Rameshwar ZP school : पत्रे उडाले; प्रशासनाची झोप उडणार कधी?

करजखेडा येथील पाहणीदरम्यान आमदार पाटील यांनी पूर्णतः कोरडा पडलेला पाटबंधारे तलाव दाखवत जिल्ह्यातील पाण्याची गंभीर परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. तसेच उजनी धरणातून एक टीएमसी पाणी रामदरा तलावात आणण्याची मागणी केली होती.

जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने विविध जलप्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा केवळ आठ टक्के राहिला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह पशुधनासाठी पाणी उपलब्ध करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. उजनी धरणातून भीमा-सीना बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडून घाटणे बॅरेजच्या माध्यमातून रामदरा तलाव भरण्याचे नियोजन आहे.

Dharashiv News : धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी उजनीतून देण्याचे निर्देश
Illegal Liquor Seized Umerga | अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

उजनीचे पाणी धाराशिवपर्यंत आणण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या दृष्टीनेही हा निर्णय महत्त्वाचा आहे. उपसा सिंचन योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणी घेण्याचे नियोजन आहे. रामदरा, सिंदफळ व पांगरदरवाडी तलावांत पाणी उपलब्ध झाल्यास दुष्काळी काळातील पाणीटंचाई कमी करण्यास मदत होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news