Dharashiv ZP | धाराशिव जि. प अध्यक्षपदासाठी महायुतीकडून अर्चना पाटील, उपाध्यक्षपदासाठी उषा गायकवाड रिंगणात 

महाविकास आघाडीनेही उतरविले उमेदवार 
Archana Patil candidacy confusion
धाराशिव : अर्चना पाटील यांच्या उमेदवारीने वाढला संभ्रम!pudhari photo
Published on
Updated on

Dharashiv ZP President election news

धाराशिव : जिल्हा परिषदेत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. मात्र संख्यबळ पाहता महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे.

महायुतीकडून अध्यक्षपदासाठी भाजपच्या अर्चना पाटील तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या उषा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले आहेत. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर महायुतीने सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Archana Patil candidacy confusion
Dharashiv news | उचलीच्या पैशांवरून अमानुष छळ; भूम तालुक्यात ऊसतोड मजुराने जीवनयात्रा संपवली

दुसरीकडे महाविकास आघाडीनेही अध्यक्ष-उपाध्यक्ष पदांवर दावा सोडलेला नाही. अध्यक्षपदासाठी कांचनमाला संगवे (उबाठा) तर उपाध्यक्ष पदासाठी महेश देशमुख (काँग्रेस)  यांचे अर्ज दाखल झाले आहेत. काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या एकत्रित पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीही मैदानात उतरली आहे.

दरम्यान, दोन्ही गटांकडील संख्याबळ पाहता महायुतीचे उमेदवार सहज विजयी होतील, अशी चिन्हे आहेत.  तत्पूर्वी कडेकोट  सुरक्षा व्यवस्थेत महायुतीचे सर्व सदस्य शुक्रवारी  शहरात दाखल झाले. निवडणुकीचे निकाल लागल्यापासून या सर्वांना अज्ञातस्थळी सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news