कौतुकास्पद | उमरगा तालुक्यात २९ गावांत 'एक गाव, एक गणपती' उपक्रम

Ganeshotsav 2024 | एकीचा संदेश देण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार
Umarga Taluka Ganpati festival
पतंगे रोड परिसरात श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती.Pudhari News Network
Published on
Updated on

शंकर बिराजदार

उमरगा : उमरगा (जि. धाराशिव) शहर व तालुक्यात गणपती बप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरयाच्या नामघोषात उत्साही वातावरणात शनिवारी (दि ७) 'श्री' ची प्रतिष्ठापना करण्यात आली. तालुक्यातील २९ गावांनी 'एक गाव, एक गणपती' हा विधायक उपक्रम राबवला आहे. गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी पोलिसांचे विशेष पथक गस्तीवर ठेवण्यात आले आहे. (Ganeshotsav 2024)

शहरातील पतंगे रोड परिसरात सकाळी आठ वाजल्यापासून श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्ती विक्री स्टॉल्सवर खरेदीसाठी झुंबड उडाली होती. पूजेसाठी विविध फुले तसेच नैवैद्यासाठी लागणाऱ्या केळी पाने, सजावट साहित्य, मिठाई स्टॉल्सवर भक्तांनी गर्दी केली होती. हजारो छोट्या सुबक गणेशमूर्ती दुचाकी, टमटम, कार, ट्रॅक्टर तर कोणी पायी "गणपती बाप्पा मोरया 'च्या गजरात घरी नेत होते. मंगलमय वातावरणात आसमंत ढोल - ताशांचा निनाद व फटाक्यांची आतषबाजीने दणाणून गेला."गणपती बाप्पा मोरया', "मंगलमूर्ती मोरया' असा जयघोष करत सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे मंगलमयी वातावरणात स्वागत केले. (Ganeshotsav 2024)

तसेच घरगुती गणेशाची भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना केली. दरम्यान, दुपार पासून विविध मंडळांच्या मिरवणुकीने महामार्ग व अंतर्गत रस्ते गजबजून गेले होते. तर सार्वजनिक गणेश मंडळांच्या रोषणाईमुळे रस्ते सायंकाळपासून उजळून निघाले होते. गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम, देखावे, विविध स्पर्धेचे आयोजन केले आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनावेळी महामार्ग व अंतर्गत रस्त्यावर वाहतूक कोंडी व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विशेष पथकांचा फिरता पहारा !

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी विशेष पथकांची नेमणूक केली आहे. या पथकाचा रात्रंदिवस फिरता पहारा राहणार आहे. या दरम्यान, सार्वजनिक रस्त्यांवर वाहतूक अडविणे, अस्तित्व लपवून फिरणारे, असभ्य वर्तन करणारे, बेवारस वस्तू व हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आढळल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.

२९ गावांत 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमातून एकाच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. पुरोगामी चळवळीचा आदर्श कायम ठेवत एकीचा संदेश दिला आहे. आपसातील वैर नष्ट व्हावे, एकोपा कायम राहावा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, अशा सूचना केल्याने 'एक गाव, एक गणपती' या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
अश्विनी भोसले, पोलीस निरीक्षक, उमरगा
Umarga Taluka Ganpati festival
धाराशिव : उमरगामध्ये डेंग्युमुळे चार दिवसांत दोघांचा मृत्यू

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news