Dharashiv Gutkha Smuggling : तलमोड चेकपोस्टवर सहा लाखांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा

गुटख्याच्या अवैध वाहतुकीवर पोलिसांचे लक्ष
Dharashiv Gutkha Smuggling
Dharashiv Gutkha Smugglingpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : स्विफ्ट डिझायरमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उमरगा पोलिसांनी तलमोड चेकपोस्ट येथे नाकाबंदी करून कारवाई केली.

या कारवाईत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला हिरा पान मसाला व रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू असा २ लाख ७४ हजार ५० रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर असा एकूण ५ लाख ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Dharashiv Gutkha Smuggling
Dharashiv healthcare : उमरगा उपजिल्हा रुग्णालयात मोर्च्युरी कॅबिनेट अखेर उपलब्ध

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट डिझायर (एमएच १४ जीडी १३३७) मधून अवैध गुटखा वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने तलमोड चेकपोस्ट येथे सापळा रचून दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास संशयित वाहन अडवले.

Dharashiv Gutkha Smuggling
Sambhajinagar leopard terror: गंगापूर तालुक्यात नेमके किती बिबटे

वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये एकूण ५ लाख ७४ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी चालक शेख रेहान शेख रहीम (वय ३१, रा. मोमीनपुरा, बीड) आणि सय्यद अफरोज सय्यद सलीम (वय २८, रा. मोहम्मादिया कॉलनी, मोमीनपुरा, बीड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news