Dharashiv | संत गोरोबाकाका समाधी सोहळ्यास भक्तिमय प्रारंभ

तेर : तेरणाकाठी वारकऱ्यांची मांदियाळी; प्रशासनाचा चोख बंदोबस्त
Dharashiv news
तेर : संत गोरोबाकाका यांच्या समाधीची महापूजा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील, मल्हार पाटील, मंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे बारवडे यांच्या उपस्थितीत झाली.pudhari photo
Published on
Updated on

तेर : तेर नगरीतील श्री संत गोरोबाकाका यांच्या वार्षिक समाधी सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला असून प्रदक्षिणा मार्गावर सडा रांगोळ्यांनी सजवलेले वातावरण आणि "ज्ञानोबा-तुकोबा "च्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. वारकऱ्यांची मांदियाळी असल्याने तेर गाव गजबजलेआहे.

दि. १३ रोजी संत गोरोबाकाका यांच्या समाधीची महापूजा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील, युवा नेते मल्हार पाटील, मंदिर ट्रस्टच्या प्रशासक रूपाली कोरे बारवडे तसेच उद्योजक दत्तात्रय मुळे व ऊषा मुळे यांच्या हस्ते विधीवत करण्यात आली. यावेळी मंदिर समितीचे निरीक्षक अतुल नळणीकर, पद्माकर फंड, नवनाथ नाईकवाडी, रघुनंदन महाराज पुजारी, बंडू पुजारी, अजित कदम, अमोल कस्तुरे आणि संजय कडाप्पा इंगळे आदी उपस्थित होते.

Dharashiv news
Shaktipeeth Highway Dispute | शक्तिपीठातून मुक्ती झाल्याबद्दल खा. चव्हाणांच्या सत्काराचा घाट !

सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत तेर नगरीत नगरप्रदक्षिणा काढली. प्रत्येक फडावर दिवसभर प्रवचन, कीर्तन, भारूड आणि भजन यांसारख्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली, त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.

यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या नेतृत्व खाली ढोकी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. दरम्यान, यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मंदिराच्या प्रशासक रूपाली कोरे बारवडे, धाराशिवच्या तहसीलदार मृणाल जाधव, सरपंच दीदी काळे, उपसरपंच श्रीमंत फंड आणि ग्रामविकास अधिकारी बाबासाहेब खोचरे यांनी केले आहे.

Dharashiv news
Action against Gamblers in Nanded |जुगार अड्ड्यावर छापा; १२ जुगाऱ्यांवर कारवाई

समाधी सोहळ्यानिमित्त मंदिर गाभारा व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. आमदार राणाजगजितसिंह पाटील, रणसम्राट ग्रुप, रचना कन्स्ट्रक्शन कंपनी, तेरणा पब्लिक स्कूल, विजय कुलकर्णी परिवार तसेच विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या वतीने भाविकांना खिचडी, थंड पेये, केळी आणि पिण्याचे पाणी वाटप करण्यात आले.

सामाजिक संस्थांच्या वतीने ठिकठिकाणी पाणपोईही उभारण्यात आल्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी धाराशिव-लातूर विभागाकडून जादा बस सोडण्यात आल्या असून धाराशिव, कळंब, लातूर व औसा आगारातून सुमारे २५ बसची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक व महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून आरोग्य प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news