Dharashiv political clash: भाजपा शिवसेना गटात तुंबळ हाणामारी; एका नगरसेवकासह ३ जण गंभीर जखमी

दरम्यान दंगल नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होता
Dharashiv political clash: भाजपा शिवसेना गटात तुंबळ हाणामारी; एका नगरसेवकासह ३ जण गंभीर जखमी
Published on
Updated on

वाशी : शहरातील शिवसेना (ठाकरे गट) व भाजपा गटांतील युवकांमध्ये झालेल्या हाणामारीत एका नगरसेवकासह तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि.११) दु. ३ वाजेच्या सुमारास तांदुळवाडी रोडवरील भैरवनाथ शुगर जवळ घडली. जखमींवर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना धाराशिव, बार्शी व कळंब येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाशी शहरातील भाजपा व शिवसेना (ठाकरे गट) गटातील युवकांमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दीक चकमक होऊन मोठया वादास तोंड फुटले. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामध्ये बालाजी लहू कवडे, शिवसेना (उबाठा गटाचे ) - नगरसेवक -दिग्विजय प्रशांत चेडे, विशाल दिगंबर चेडे व अजय बाळासाहेब कुदळे हे गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी वाशी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. त्यावेळी रुग्णालय परिसरात दोन्ही गटातील युवकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती वाशी पोलिसांना मिळतात वाशी पोलिसांचे एक पथक रुग्णालय परिसरात दाखल झाले होते. दंगल नियंत्रण पथकासह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होता .

Dharashiv political clash: भाजपा शिवसेना गटात तुंबळ हाणामारी; एका नगरसेवकासह ३ जण गंभीर जखमी
Dharashiv news: पवनचक्कीचे साहित्य चोरणारी सराईत टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

पथकाने जमावला पांगवत शांत राहण्याचे आवाहन केले. दरम्यान घटनेची माहिती जिल्हा पोलीस मुख्यालयाला मिळताच मुख्यालयाकडून त्वरित दोन दंगल नियंत्रण पथके वाशीकडे रवाना करण्यात आली आहेत . जखमींवर वाशी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी धाराशिव बार्शी व कळंब येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. दरम्यान मारामारीचे नेमके कारण काय होते याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Dharashiv political clash: भाजपा शिवसेना गटात तुंबळ हाणामारी; एका नगरसेवकासह ३ जण गंभीर जखमी
Dharashiv News : पोलिसांना पाहताच दरोडेखोरांची पळापळ

या घटनेप्रकरणी अद्याप कोणाचीही तक्रार वाशी पोलीसात दाखल झालेली नाही. वाशी शहरात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी पोलीस पथकासह दंगल नियंत्रण पथकाने मंगळवारी शहरातून पथसंचलन केले. या हाणामारीच्या घटनेमुळे वाशी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Dharashiv political clash: भाजपा शिवसेना गटात तुंबळ हाणामारी; एका नगरसेवकासह ३ जण गंभीर जखमी
Dharashiv News : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

दोन गटात झालेल्या हानीमारीची पोलीसात दोन्ही गटाकडून तक्रार आलेली नाही , त्या मुळे गुन्हा नोंद नाही . शहरात शांतता आहे.

श्री -शंकर शिंदे , वाशी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news