Dharashiv Crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा खून; फरार पतीला शेतातील गोठ्यातून अटक

पिंपळगाव (डोळा) शिवारातील गोठ्यातून घेतले ताब्यात; चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची पोलिसांची माहिती
Kalamb Crime News
फरार झालेल्या गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे याला कळंब पोलिसांनी अटक केली. Pudhari
Published on: 
Updated on: 

Kalamb Crime News

कळंब : चारित्र्यावर संशय घेत चैन आणि दगडाने डोक्यात वार करून पत्नीची हत्या केल्यानंतर फरार झालेल्या गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे याला कळंब पोलिसांनी अटक केली. पिंपळगाव (डोळा) शिवारातील एका शेतातील गोठ्यात तो लपून बसल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या कालावधीत हसेगाव (के) शिवारात मानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात ही घटना घडली. पत्नी कोमल गणेश उर्फ विनायक शिवाजी टेकाळे हिच्या चारित्र्यावर संशय घेत आरोपी पती गणेश याने तिच्या डोक्यावर चैन आणि दगडाने वार केले. या हल्ल्यात कोमल यांचा मृत्यू झाला.

Kalamb Crime News
Dharashiv Labour Protest : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला हजारो मजुरांचा मोर्चा

याप्रकरणी बंडू विश्वंभर पवार (रा. करंजकल्ला, ता. कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुरू होता. मात्र, तो वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी पिंपळगाव (डोळा) शिवारातील शेतातील गोठ्यात छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कळंब पोलीस करीत आहेत.

Kalamb Crime News
Cattle Theft Dharashiv | शेतातील गोठ्यातून म्हैस आणि दोन रेड्या चोरीला; शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शकील शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान बजबळकर तसेच पोलीस अंमलदार अनिल भोसले, किरण माळी, औदुंबर गजबार आणि सुनील तारळकर यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.