Dharashiv Crime | चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून; मुलाच्या पायाला लागलेल्या रक्तावरून घटनेचा उलगडा

हसेगाव शिवारातील घटना; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
Dharashiv Wife Killed
कोमल टेकाळेPudhari
Published on: 
Updated on: 

Dharashiv Kalamb Wife Killed

कळंब : चारित्र्यावर संशय घेत पत्नीला मारहाण करून तिचा खून केल्याची घटना कळंब तालुक्यातील हसेगाव (के) शिवारातील पेट्रोल पंपासमोरील शेतात घडली. याप्रकरणी पतीविरुध कळंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, मृत कोमल (वय २८) हिचे  गणेश ऊर्फ विनायक शिवाजी टेकाळे याच्यासोबत सुमारे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आहे. गणेश याला दारू पिण्याची सवय असून तो पत्नीला वारंवार मारहाण करीत होता. तसेच तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. 

Dharashiv Wife Killed
Dharashiv News : ...अन्‍यथा ग्रामपंचायतीसमोर कचरा टाकण्याचा इशारा

बुधवारी (दि. ७) दुपारी साडेतीनच्या सुमारास गणेश याने कोमलला दुचाकीवर जबरदस्तीने बसवून नेले. त्यानंतर तिच्या मुलाला घराजवळ सोडले. मुलाच्या पायाला रक्त लागल्याचे दिसल्यानंतर कुटुंबीयांनी कोमलचा शोध सुरू केला. मुलाने दिलेल्या माहितीनुसार कुटुंबीय स्वामी समर्थ मंदिर परिसरात गेले. तेथे कोमलला मारहाण करून पुढे नेल्याचे समोर आले. 

सायंकाळी कुटुंबीय पोलीस ठाण्यात जात असताना आरोपीच्या नातेवाईकाला फोन करून कोमलचा खून केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मानधने पेट्रोल पंपासमोरील शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. कोमलचे वडील बंडू विश्वंभर पवार यांनी फिर्याद दिली. आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान गोपीनाथ बजबळकर करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news