धाराशिव : कळंब मध्ये द्वारकानगरीतील महिलेच्या संशयास्‍पद मृत्यूने खळबळ

Dharashiv Crime News | घरी एकटीचेच वास्‍तव्य, पोलिसांकडून खून झाल्‍याचा संशय
Dharashiv Crime News
मृत महिला Pudhari Photo
Published on
Updated on

कळंब : शहरातील द्वारकानगरीतील मनिषा बिडवे नामक महिलेचा मृत्यू झाल्याचे गुरूवारी सकाळी निष्पन्न झाले. शेजाऱ्यांना उग्र वास येत असल्याचे जाणवले त्यांनी एखाद्या प्राणी मयत झाला आहे का तपासले असता तसे तिथे काही आढळून आले नाही. परत बिडवे नावाच्या महीलेच्या कघरातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलीसाना बोलावले दरवाजा तोडून आत मध्ये प्रवेश केला असता सदरील महिला मृत अवस्थेत आढळून आली.

ही महिला गेले अनेक दिवस एकटीच रहात असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लवकर समजले नाही. साधारणत अगोदरच पाच ते सहा दिवस अगोदरच हत्या झाली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे. महीलेचे माहेर अंबाजोगाई येथील पठाण मांडवा असल्याचे समजते तर सासर केज तालुक्यातील आडस येथील असल्याचे समजते. सदरील महीलेची हत्या झाली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे परंतु पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतरच हे स्पष्ट होईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

दमानियांचे ट्विट आणि चर्चा

आज सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांनी या महिलेचा आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संबंध असल्यानेच ट्विट केले आणि खळबळ उडाली परंतू सदरील महीलेचा आणि देशमुख प्रकरणाचा संबंध निष्पन्न होत नसल्याचे  पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ब्लॅकमेलिंग मधून खून झाल्याचा संशय

या महिलेची एक नव्हे तर तब्बल चार लग्नं झाल्याची माहिती समोर येत आहे तिचे आडनावे पण बिडवे, आकुसकर, बियानी असे समोर येत आहेत. सध्या ही महिला एकटीच रहात होती. मैत्री करून व्हिडिओ बनविने व ब्लॅकमेलिंग करणे असा व्यवसाय या महिलेचा होता अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. त्यामुळेच ब्लॅकमेलिंग मधूनच हा खून झाला असावा असा पोलीसांचाही संशय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news