धाराशिवच्या 'आयटीआय'ला उद्धवराव पाटील यांचे नाव

धाराशिवच्या 'आयटीआय'ला उद्धवराव पाटील यांचे नाव
Dharashiv news
धाराशिवच्या 'आयटीआय'ला उद्धवराव पाटील यांचे नाव pudhari photo
Published on
Updated on

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : केवळ राज्यातच नव्हे, तर देशभरात नैतिक राजकारणाचा मापदंड म्हणून आजही मोठ्या आदराने उध्दवराव पाटील यांचा नामोल्लेख केला जातो. शेतकऱ्यांचे कैवारी असलेल्या झुंजारसेनानी भाई उध्दवराव पाटील यांनी केवळ शेती आणि शेतकरी एवढ्यापुरते स्वतःला सीमित ठेवले नव्हते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या 'आयटीआय'ला त्यांचे नाव दिल्यामुळे अनेकांना त्यातून मोठी प्रेरणा मिळणार असल्याचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्राला उध्दवराव पाटील यांचे नाव अधिकृतपणे जाहीर करण्यात आले. त्याच्या नामफलकाचे अनावरण ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भाई उध्द- वराव दादांनी स्वयंरोजगाराची कास सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी घरायला हवी, असा विचार सातत्याने मांडला.

काळाची गरज ध्यानात घेऊन मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा ते आग्रह धरीत. स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने महत्त्व पूर्ण असलेल्या या संस्थेला त्यांचे नाव दिल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींना मोठी ऊर्जा मिळणार आहे. दादांच्या प्रभावातूनच आपली जडणघडण झाली आहे आणि एका शासकीय संस्थेला दिलेल्या दादांच्या नामफलकाचे अनावरण आपल्या हस्ते करता आल्याचा आनंद मोठा आहे. अशी भावना ज्येष्ठ शिक्षणतज्ञ एम. डी. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केली. भाई उद्धवराव यांच्या नावाप्रमाणे या संस्थेचा लौकिकही राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याखेरीज राहणार नाही, असे उद्गार पाटील यांनी काढले.

यावेळी नितीन काळे, देशमुख, मधुकर तावडे, सतीश दंडनाईक, रामदास कोळगे, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, संदीप इंगळे, पुष्पकांत माळाळे, बिलाल रजवी, गणेश इंगळगी, विनोद निंबाळकर यांच्यासह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

तीन ठिकाणी सोहळे

दरम्यान, कळंब येथील 'आयटीआय'ला संत गोरोबा काका यांचे नाव तर तुळजापूर येथील 'आयटीआय'ला माजी आमदार सी. ना. आलुरे यांचे नाव देण्यात आले आहे. या दोन्ही ठिकाणचे नामांतर व फलक अनावरण सोहळे सोमवारी आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत झाले

Dharashiv news
उस्मानाबादचे ‘धाराशिव’ यापूर्वीही झाले होते! जाणून घ्या, काय आहे धाराशिवच्या नाव बदलाचा इतिहास

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news