

रत्नापूर : पुढारी वृत्तसेवा
वाशी तालुक्यातील बावी शिवारात विहिरीचे पाणी देण्यावरून तुफान हाणामारीची घटना घडली. या घटनेत तिघांचा बळी गेला. ही घटना येरमाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बावी शिवारात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, वाशी तालुक्यातील भावी येथील पारधी समाजात शेतीला पाणी देण्यावरून विहिरीचे पाणी वाटपावरून दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली. ही घटना दिनांक 5 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारात झाली. यामध्ये एका कुटुंबातील आप्पा परमेश्वर काळे व सुनील परमेश्वर काळे व दुसऱ्या कुटुंबातील आप्पा भाऊ काळे या तिघा जणांना जागी जीव गमावा लागला. तर वसाला आप्पा काळे ही गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी धाराशिव येथे दाखल करण्यात आले आहे.
घटना घडल्याचे कळताच येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश क्षीरसागर यांनी आपल्या पोलीस ताफ्यासह घटनास्थळ गाठले व पुढील होणाऱ्या घटनेस पाय बंद घातला. घटनेचा पंचनामा करून संशयित पाच संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, वाद नेमका कसा सुरू झाला व कशामुळे या दोन घरात दरी निर्माण झाली याबाबत पोलीस पुढील तपास करत आहेत.