Dharashiv Crime |थायलंड येथे नोकरीच्‍या आमिषाने तरुणाचे अपहरण, गुन्‍हा दाखल!

खेड येथील तरुणाला डांबले : फेसबुकवर नोकरीसंदर्भातील जाहिरात
Kidnapping News
Kidnapping NewsPudhari
Published on
Updated on

धाराशिव : नोकरीच्या आमिषाने परदेशात पाठविण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक करुन त्‍याला डांबून ठेवले असल्‍याची फिर्याद दाखल झाल्‍याने धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्‍या माहितीनुसार फिर्यादी ज्ञानेश्वर हरिश्चंद्र गरड (रा. खेड, ता. जि. धाराशिव) यांचा भाऊ अनिकेत हरिश्चंद्र गरड (वय २२) याने दि. १ मे २०२६ रोजी फेसबुकवर नोकरीसंदर्भातील जाहिरात पाहिली. त्यानंतर अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन काही एजंटांनी संगनमत करून त्याला थायलंड येथे नोकरी देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून अनिकेत यास परदेशात नेण्यात आले. मात्र तेथे त्याचे अपहरण करून डांबून ठेवण्यात आले तसेच त्याच्याकडून जबरदस्तीने ऑनलाईन फसवणुकीचे काम करून घेत शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या धक्‍कादायक फिर्यादीची नोंद सायबर पोलिस ठाण्‍यात करण्‍यात आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तांत्रिक विश्‍लेषणा आधारे तपास सुरु केला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news