Dharashiv Crime | धाराशिवमध्ये 10 कोटी रुपयांचे नशेसाठी वापरले जाणारे हशीश ऑईल जप्त!

नळदुर्ग पोलिसांची कारवाई, नशेसाठी होतो वापर
Dharashiv Crime
Dharashiv Crime | धाराशिवमध्ये 10 कोटी रुपयांचे नशेसाठी वापरले जाणारे हशीश ऑईल जप्त!
Published on
Updated on

धाराशिव : नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या पथकाने नाकाबंदी व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान मोठी कारवाई करत सुमारे 10 कोटी 38 लाख 20 हजार रुपये किमतीचे हशीश ऑईल सदृश्य अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

गुरुवारी (दि. 19) उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग ते तुळजापूर मार्गावर नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना संशयास्‍पद कार (एमएच 12 जीव्ही 1517) दिसून आली. वाहन थांबवण्याचा इशारा देताच चालकाने वेगाने पळ काढला. पोलिसांनी तत्काळ पाठलाग सुरू केला. दरम्यान, गाडीतून एका इसमाने रस्त्याच्या कडेला एक बॅग फेकून दिली.

पोलिसांनी बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये दहा प्लास्टिक पिशव्यांमध्ये हिरवट-काळपट रंगाचे हशीश ऑईल सदृश्य अंमली पदार्थ आढळून आले. या पदार्थाचे एकूण वजन 10.382 किलो असून त्याची किंमत 10.38 कोटी रुपये इतकी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी पंचनामा करून हा माल जप्त केला आहे. या प्रकरणी गुंगीकारक औषधी व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली प्रभारी अधिकारी मेघना आय.एन., पोलीस निरीक्षक सोळुंके, आनंद कांगुने, उपनिरीक्षक गिते व पथकाने केली.

हशीश ऑईल म्हणजे काय? 

हशीश ऑईल हा गांजाच्या वनस्पतीपासून तयार होणारा एक अत्यंत शक्तिशाली अंमली पदार्थ आहे. यामध्ये टीएचसीचे (टेट्राहायड्रो कॅनाबिनॉल) प्रमाण जास्त असल्यामुळे मेंदूवर तीव्र परिणाम होतो. याचा वापर नशेसाठी, विशेषतः धूम्रपान किंवा व्हेपिंगद्वारे केला जातो. काही ठिकाणी तो खाद्यपदार्थांमध्येही मिसळला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारात हशीश ऑईलची मागणी जास्त असून भारतात त्याची किंमत अत्यंत महाग असते. बेकायदेशीर व्यापारात प्रति किलो किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. एनडीपीएस कायद्यानुसार याचे उत्पादन, साठवण आणि विक्री गुन्हा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news