Dharashiv Crime : परंडा तालुका हादरला! ज्यूसधून तरूणीला गुंगीचे औषध, अत्याचार अन् व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

तीन नराधमांवर गुन्‍हा दाखल
sexual assault case
sexual assault casefile photo
Published on
Updated on

परंडा : तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीला मँगो ज्‍यूसमधून गुंगीचे औषध देऊन अत्‍याचार करण्यात आला.

sexual assault case
Kolhapur Crime | व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; तरुणीवर चौघांकडून आठ महिने अत्याचार, मुरगूड पोलिसांत गुन्हा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मे रोजी पीडित तरुणी घरी असताना गावातील एका तरुणाने मोबाईल चार्जिंगचे कारण सांगून तिच्याशी संपर्क साधला. त्यानंतर तिला ज्यूस पाजून बेशुद्ध अवस्थेचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेचे चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याच कालावधीत गावातील अन्य एका तरुणानेही पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पिडीतेने केला आहे. तसेच ३ जून रोजी तिसऱ्या संशयिताने पीडितेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ५ जून रोजी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलिस करीत आहे. आरोपी तसेच पिडीतेचे नाव पोलिसांनी गोपनीय ठेवले आहे.

sexual assault case
Minor girl human trafficking case | ६० हजारांत १४ वर्षांची मुलगी विकत घेतल्याचा दावा; तरुणाचा वकिलाला धक्कादायक सवाल

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news