धाराशिव: भूममध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

Dharashiv crime: जुन्या वादातून गुन्हा ; तीन आरोपींवर गुन्हा दाखल
Dharashiv crime news
उस्मानाबाद : भूममध्ये दिवसाढवळ्या तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्लाFile Photo
Published on
Updated on

भूम : भूम शहरातील भूम-नगर रोडवरील साहिल कॉम्प्लेक्सजवळ एका तरुणावर दिवसाढवळ्या कोयत्याने हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय असून, पोलिसांनी तीन आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं ?

फिर्यादी वसीम नसीर बेग मोगल (वय २९), जो अलमप्रभू नावाने पानटपरी चालवतो. याच्यावर दि. २८ फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी ०४.०० वाजता भूम ते नगर जाणारे रोडवरील साहिल कॉम्लेक्स जवळ आलमप्रभू पानटपरी समोर भूम येथे सलमान दस्तगीर पठाण (रा. शिवशंकरनगर, भूम) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी हल्ला केला. सलमान पठाण याने फिर्यादीला पानटपरीबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्या साथीदारांनी फिर्यादीला पकडून ठेवले आणि पठाण याने "आता तुला जीवंत सोडत नाही" असे म्हणत कोयत्याने वार केले. फिर्यादीने प्रतिकार केला, मात्र त्याच्या खांद्यावर, पाठीत आणि कंबरेवर गंभीर वार झाले. पळून जात असताना एकाने त्याच्या हातावरही वार केला.

दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

या घटनेनंतर वसीम मोगल याला तातडीने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी सलमान पठाण आणि दोन अज्ञात व्यक्तींविरोधात दि. ०१. मार्च रोजी ४.०७ वा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. तपास पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सरोदे करत आहेत.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे भूम शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news