Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ. भिमराव आंबेडकर यांचे नाव द्या

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांची अजितदादांकडे मागणी
Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ. भिमराव आंबेडकर यांचे नाव द्या
Published on
Updated on

Demand to name government medical college after Dr. Bhimrao Ambedkar

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नाट्यगृह दुरुस्त करावे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सरचिटणीस विशाल शिंगाडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ. भिमराव आंबेडकर यांचे नाव द्या
Dharashiv Collector Dance Viral Video : इकडं पुरानं संसार उद्ध्वस्त; तिकडं धाराशिवचे जिल्हाधिकारी 'गार डोंगराची हवा...' गाण्यावर नाचण्यात व्यस्त

धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार आले होते. या वेळी मा. विशाल शिंगाडे यांनी धाराशिव शहरातील विविध मागण्या विषयी निवेदन दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाचे १४ वर्षापूर्वी उद्घाटन होऊन देखील अद्याप नाट्यगृह चालू नाही.

तरी सदर नाट्यगृह तात्काळ सुव्यवस्थित चालू करावे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय व महाविद्यालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे. शासकीय रुग्णालय धाराशिव येथील सीटी स्कॅन, एमआरआय मशीन व अद्यावत सुविधा चालू कराव्यात.

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ. भिमराव आंबेडकर यांचे नाव द्या
Dharashiv Rain : परंडा तालुक्यात महापुराचा तडाखा; संसारोपयोगी साहित्य उध्वस्त

तुळजाभवानी स्टेडियम धाराशिव येथील जलतरण तलाव पंधरा वर्षांपूर्वी बांधण्यात आला असून तो आजतागायत नादुरुस्त आहे. तो दुरुस्ती करून द्यावा. धाराशिव शहरातील भीम नगर येथे असलेल्या बुद्ध विहारास ५० लाख रुपये दुरुस्तीसाठी निधी द्यावा. धाराशिव शहरातील एकमेव असलेले जिजामाता उद्यान दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुले करावे. या निवेदनावर शशीकांत माने, सतिश ओव्हाळ, सुगत सोनवणे, विजय उंबरे, ताहीर शेख यांच्या सह्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news