

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी देवीचा गाभारा विविध फुलांनी सजविण्यात आला. मंगळवारी (दि. १७) देवीची नित्योपचार पूजा करण्यात आली. तिसरी माळ झाल्याने आता दर्शनासाठी भाविकांची गर्दी सुरु झाली आहे.
पहाटे ६ ते सकाळी १० या वेळेत देवीची अभिषेक पूजा करण्यात आली. त्यानंतर आरती झाली. यापद्धतीने श्री तुळजाभवानी देवीजींचे दररोज विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात. सोमवारी रात्री दुसऱ्या माळेच्या दिवशी अभिषेक पूजेनंतर देवीला वस्त्र अलंकार चढविण्यात आला. त्यानंतर धूप आरती करण्यात आली. रात्री श्री तुळजाभवानी मंदिरात नंदी वाहनावरून छबिना मिरवणूक काढण्यात आली.