खा. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस उतरली रस्त्यावर

केंद्रीय शिक्षणमंत्री प्रधान, गृहमंत्री शहा यांच्या राजीनाम्याची मागणी
Congress takes to the streets to protest
खा. राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस उतरली रस्त्यावरfile photo
Published on
Updated on

Congress takes to the streets to protest against the arrest of MP Rahul Gandhi

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शिक्षण व्यवस्थेतील अनागोंदी, नीट पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार तसेच विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी (दि. २२) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

Congress takes to the streets to protest
Social Justice scholarship : शिष्यवृत्ती अडकली; महाविद्यालयांकडून विद्यार्थी वेठीस

जंतर-मंतर येथे पेपरफुटी, बेरोजगारी आणि भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व अटक केली. ही कारवाई लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असल्याची टीका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली. विद्यार्थी पेपरफुटीविरोधात आवाज उठवत आहेत, बेरोजगार युवक रोजगाराची मागणी करत आहेत; मात्र त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सरकारकडून दडपशाही केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

Congress takes to the streets to protest
Dharashiv News : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

नीट पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करत प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. संविधान, लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news