

अणदूर, पुढारी वृत्तसेवा तुळजापूर तालुक्यातील अणदर व परिसरात ढग फुटी सदृश्य पावसाने सलग २ ते ३ तास जोरदार हजेरी लावल्याने शेती सह गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अणद्र महामार्गशेजारील येथील सर्व्हिस रोड व नालीचे काम न केल्याने राष्ट्रीय महामार्ग क्र.६५ शेजारी वत्सलानगर परिसरातील नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग बंद करीत रस्ता रोको आंदोलन केले.
नुकसानग्रस्त नागरिकांनी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आ. राणाज गजीतसिंह पाटील यांना दूरध्वनीवरून समस्या व व्यथा मांडल्या. याबाबत आपण अधिकाऱ्यांशी चर्चा करून कार्यवाही करू असे म्हटल्याचे नुकसान ग्रस्त नागरिकांनी सांगितले. सोलापूर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रस्ता निर्मिती कंपनीच्या निष्क्रियतेमुळे अणदूरकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. महामार्गशेजारील देशमुख वस्ती ते अणदूर बसस्थानक दरम्यान साईड रोडचे काम कंपनी कडून अर्धवट करण्यात आले आहे.
काम करताना पुर्वी पाणी वाहणाऱ्या नाल्या भुजवल्या आहेत. पावसाचे पाणी रस्त्या लगत असलेल्या अनेक घरामध्ये गेल्याने अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. घरातील जीवनावश्यक वस्तू पाण्यावरती तरंगत होत्या. घरातील संसारोपयोगी साहीत्य खराब झाल्याने ज झाले आहे. महामार्ग रुंदीकरणात अणदूर येथील बसस्थानक ते देशमुख वस्ती दरम्यान दोन्ही बाजूस नाली काम करण्यात येणार होते ते पूर्ण झाले नाही व करण्यात आ लेली नाली उंचारबरती व घरे खाली असल्याने याचाच फटका शेजारील परांना, दुकानांना बसला असून कंपनीवरती सरकारने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
पाच वर्षापर्वी खा. राजेनिंबाळकर व आ. पाटील यांनी या समस्येच्या ठिकाणाला भेट देऊन कार्यवाही करू व नागरिकांच्या समस्या सोडवू असे आश्वासन दिले होते. मात्र या पाच वर्षांमध्ये कुठलीच कार्यवाही झाली नाही. या समस्या सुटल्या नाहीत.
त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. रस्ता निर्माण कंपनीच्या गलथान कारभारामुळे अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. या संपूर्ण प्रकराला कंपनी जबाबदार असून संबंधी अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंद करून संबंधित कंपनीवरती कारवाई करून नुकसानग्रस्तांचे नुकसान भरपाई करून द्यावे असे नुकसानग्रस्त नागरिकांतून मागणी केली जात आहे.
संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरती बसून रस्ता बंद केला. कंपनी अधिकारी, लोक प्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी नुकसान भागास ६ तास झाले आहे त्यानंतरही भेट दिली नाही. काही उपाययोजना केल्या नाहीत त्यामुळे काही काळ या भागात तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर नागरिकांनी रस्ता रोको मागे घेत रस्ता मोकळा करून दिला.