Onion farmers protest : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दिले निवेदन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
Onion farmers protest
परंडा : उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देताना छावा संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी.pudhari photo
Published on
Updated on

परंडा : छावा संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मराठवाडा संपर्क प्रमुख अमर शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. 28) परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले.

सध्या कांदा पिकाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झालेली असताना कांद्याला अत्यल्प दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने कांदा पिकासाठी तात्काळ अनुदान जाहीर करावे तसेच कांद्याला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी शेख यांनी शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

या प्रसंगी मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख, जिल्हा उपाध्यक्ष आकाश नारायण जेधे, विधी सल्लागार ड. महेश चोपडे, तालुकाध्यक्ष सुधीर लटके, तालुका उपाध्यक्ष रामराजे काकडे, शहराध्यक्ष हरिभाऊ आदमीले, माजी सरपंच पंडित जगदाळे, सुनील सातपुते, पांडुरंग गरड, बापू धनवे, सत्यवान डांगे, रोहित कदम, संस्कार गरड, श्रीमंत डोके, संजय लटके, अनिल माने, नागनाथ शिंदे, परशु इंगळे, शहाजी साळुंके, अभिलाष सूर्यवंशी, बापू जगदाळे आदींसह छावा संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news