विनोद गंगणे यांनी एकट्याने लढविला किल्ला, काँग्रेसचे अमर मगर यांच्याकडून कडवी झुंज

ड्रग्जमुळे बदनामी तरीही जनतेकडून घेतले 'सर्टिफिकेट!'
Dharashiv News
विनोद गंगणे यांनी एकट्याने लढविला किल्ला, काँग्रेसचे अमर मगर यांच्याकडून कडवी झुंजFile Photo
Published on
Updated on

Bharatiya Janata Party candidate Vinod Gangane secured his victory easily.

डॉ. सतीश महामुनी

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : गाजलेल्या व चुरशीच्या निवडणुकीमध्ये आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवणारे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विनोद गंगणे यांनी आपला विजय सहज संपादित केला.

Dharashiv News
Dharashiv Accident | कळंब - लातूर महामार्गावर ऊसतोड मजुरांना उडविले; ७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

राजकीय जाणकारांनादेखील या निवडणुकीने आपल्या अंदाज चुकवण्यासाठी भाग पाडले. ड्रग्ज प्रकरणामुळे बदनाम झालेल्या निवडणुकीमध्ये दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झालेले लक्ष्मी दर्शन महत्त्वाचे ठरले मात्र विजय मात्र भारतीय जनता पार्टीचा झाला आहे.

तुळजापूर तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र असणाऱ्या या नगरपरिषद निवडणुकीकडे सर्व राज्याचे लक्ष लागले होते. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, शिवसे-नेचे नेते ऋषिकेश मगर आणि काँग्रेसचे युवक नेते अमोल कुतवळ यांनी भारतीय जनता पार्टीच्या विर-ोधात जोरदार वातावरण निर्मिती केली होती. ड्रग्जमुळे येथे चांगलीच निवडणूक रंगात आली होती परंतु स्थानिक पातळीवर विनोद गंगणे, विजय गंगणे, पंडित जगदाळे, विशाल छत्रे, रामचंद्र रोचकरी, विशाल रोचकरी, माऊली भोसले, किशोर साठे, दिनेश क्षीरसागर, औदुंबर कदम, रत्नदीप भोसले, नरेश अमृतराव, विजय कंदले यांच्या चमूने ही निवडणूक आपल्या बाजूने वळवली.

Dharashiv News
Thackeray Shiv Sena : ठाकरेंच्या शिवसेनेला अतिआत्मविश्वास नडला

विनोद गंगणे यांच्यासाठी हा खूप अडचणीचा काळ होता. विधानसभा निवडणुकीपासूनच ड्रग्ज प्रकरणामुळे त्यांच्यावर राजकीय आक्रमण सतत होत राहिले. खा. राजेनिंबाळकर यांचा बॉम्ब हल्ला सातत्याने सुरू होता. महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी एकत्र येऊन त्यांच्यावर हल्ले चढवले होते. या सर्व पार्श्वभूमीवर विरोध गंगणे यांना ही निवडणूक जड गेली परंतु त्यांच्या स्वतःच्या कर्तबदारीने त्यांनी हे आव्हान पेलले आणि सतराशे मतांनी आपला विजय संपादित केला.

काँग्रेसचे व महायुतीचे उमेदवार म्हणून अमर मगर हा अत्यंत स्वच्छ चेहरा महावकास आघाडीने दिला होता. लोकांनी त्यांना भरभरून मतदान केले. सुशिक्षित मतदाराचा चेहरा म्हणून त्यांनी ही निवडणूक लढवली. अनेक वर्ष तुळजापूर नगर परिषदेमध्ये चांगले काम केल्यामुळे आणि उच्चशिक्षित असल्यामुळे लोकांनी विश्वासाने मतदान केले, परंतु हा लोकांचा विश्वास विजयापर्यंत पोहोचला नाही.

त्यांच्या बंधू वर झालेला हल्ला हा या निवडणुकीला लागलेला कलंक ठरला. शेवटी विनोद गंगणे यांच्या सहकाऱ्यांनीच हा हल्ला चुकीचा होता म्हणून निवेदन द्यावे लागले आणि दोर्षीवर कारवाई करण्याची मागणी करावी लागली ही महायुतीला राजकीय नामुष्की मानली जाते. तुळजापूरच्या या निवडणुकीमध्ये आ. पाटील यांचे विश्वासू आणि माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी व संतोष कदम यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला.

त्यांच्या विरोधात जिंकलेले काँग्रेस उमेदवार आनंद जगताप व अक्षय कदम यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्व प्रकारचे आयुध उपयोगात आणली साम-दाम-दंड याचा वापर केला आणि या प्रतिष्ठित उमेदवारांचा दारुण पराभव केला. महाविकास आघाडीने सर्व मतदार संघामध्ये उमेदवार देण्यामध्ये हलगर्जीपणा केला त्याचा परिणाम म्हणून त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही.

अध्यक्षपदासाठी जनतेने दिलेला प्रतिसाद लक्षात घेता भारतीय जनता पार्टीकडून दोन वर्ष अगोदर उमेदवार निश्चित करून दिलेली केलेली पायाभरणी महत्त्वाची ठरली.

लक्षवेधी चेहरे

नरेश अमृतराव, सागर कदम, माऊली भोसले, रामचंद्र रोचकरी यांचे विजय या निवडणुकीत लक्षवेधी ठरले आहेत. विजय कंदले यांचा विजय १० मताने झालेला आहे. पंडित जगदाळे हे सर्वाधिक वेळा निवडून येणारे नगरसेवक म्हणून प्रस्थापित झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news