मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उमरगा तालुक्‍यात बंद

आजच्या बंदमधून अत्‍यावश्यक सेवा वगळण्यात आल्‍या
Bandh in Umarga taluka in support of Jarange's hunger strike
जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उमरगा तालुक्‍यात बंदFile Photo
Published on
Updated on

उमरगा जि धाराशिव : शंकर बिराजदार

मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी येथे सहाव्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आज (शनिवार), (दि २१) उमरगा शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.

उमरगा शहरात सकल मराठा समाजाच्यावतीने सकाळी दुचाकी रॅली काढण्यात आली. रॅलीद्वारे जोरदार घोषणाबाजी करीत बंदचे अवाहन करण्यात आले. सकाळपासून शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. दरम्यान उमरगा आगारातून बससेवा सुरळीत सुरू असली तरी प्रवशांची संख्या तुरळक आहे. तालुक्यांतील सीमावर्ती भागात असलेल्या तुरोरी येथेही बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. दर शनिवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात आज शुकशुकाट जाणवत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news