Cyber ​​Crime : 'सायबर क्राईम' बाबत विद्यार्थ्यांत केली जागृती

येथील पीएमश्री नगरपालिका शाळेत (क्रमांक २) 'विविध तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने' या उपक्रमांतर्गत सायबर क्राईम विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
Cyber ​​Crime : 'सायबर क्राईम' बाबत विद्यार्थ्यांत केली जागृती
Cyber ​​Crime : 'सायबर क्राईम' बाबत विद्यार्थ्यांत केली जागृतीfile phot
Published on
Updated on

Awareness regarding 'Cyber ​​Crime' raised among students

कळंब, पुढारी वृत्तसेवा येथील पीएमश्री नगरपालिका शाळेत (क्रमांक २) 'विविध तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने' या उपक्रमांतर्गत सायबर क्राईम विषयावर जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

Cyber ​​Crime : 'सायबर क्राईम' बाबत विद्यार्थ्यांत केली जागृती
'सायबर गुन्ह्यांपासून संरक्षणासाठी सजगता हवी'

सहायक पोलिस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांविषयी सविस्तर माहिती दिली. मोबाईलचा मर्यादित वापर करावा, जास्तीत जास्त वेळ वाचन आणि मैदानी खेळासाठी द्यावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

तसेच 'गुड टच' आणि 'बॅड टच' याबाबतही त्यांनी मार्गदर्शन करत अशा प्रकारची कोणतीही घटना घडल्यास तात्काळ पालक, शिक्षक किंवा विश्वासू व्यक्तींना माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक मुकुंद नांगरे यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही कठीणप्रसंगी न घाबरता त्याचा सामना करावा आणि प्रत्येक अडचण ही संधी म्हणून स्वीकारावी, असे मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विशाल वाघमारे यांनी केले.

Cyber ​​Crime : 'सायबर क्राईम' बाबत विद्यार्थ्यांत केली जागृती
MLA Suresh Dhas : विकासासाठी गट-तट विसरून कामाला लागा

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक मुकुंद नांगरे, रमेश चव्हाण, प्रशांत सलगरे, विशाल वाघमारे, अमोल चव्हाण, विनोद राऊत, सयाराणी करहाड, सोनाली पाटील, गिताश्री नागटिळक, सेविका सोनाली हौसलमल तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news