धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द; पालकमंत्री तानाजी सावंत

धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द; पालकमंत्री सावंत यांचे प्रतिपादन
Dharashiv news
धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द; पालकमंत्री तानाजी सावंत pudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : जिल्हयाचे मागासलेपण ओळखून केंद सरकारने जिल्हयाचा समावेश आकांक्षित जिल्हयात कला आहे. जिल्हयाचे मागासलेगण दूर करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध वोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री महणून २४ महिन्यांत ४२ निर्णय घेऊन महाराष्ट्र निरोगी करण्याचा संकल्प केला असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर मंत्री प्रा. डॉ. सावंत बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, बुचासाहेव जाधव, प्रकाशराय तोडकरी, गोविंद नलवडे, शेषराव बनसोडे व बाळासाहेब टापरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वधी कैलास पाटील, राष्णाजगजितसिंह पाटील, ज्ञानराव चौगुले, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ऑबारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक पोष, पोलिस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन व निवासी उपजिल्हाधिकारी शोना वाधव व विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकान्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

पालकमंत्री प्रा. डॉ. सावंत म्हणाले की, आरोग्यविषयक अनेक योजना, मोहिमा व अभियान सुरू करून आशा व गट प्रवर्तक कर्मचारी यांना विमा कवच लागू करून त्यांच्या मानधनात वाढ केली. महात्मा फुले जनआरोग्य योजनेची मर्यादा दीड लाखावरून पाच लाख रुपयांपर्यंत वाढविली, केंद्र सरकारने ७० वयाचरील सर्वाना मोफत उपचार करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे देशातील साडे चार कोटी व्यक्तींना मोफत उपचार मिळणार आहे. याचा लाभ ४४ लाख माता आणि ४८ लाख ७० वर्षांवरील नागरिकांना मिळाणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३० एकर जागा हस्तांतरित करण्यात आली असून इमारतीच्या बांधकामासाची ५५० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ल्यातून उपचारासाठी देणाऱ्या रुणांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी ५०० खाटांचे नवीन जिल्हा सामान्य एग्णालय मंजूर केले आहे.

रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी २५ एकर जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या बांधकामासाठी ३५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि परंडा येथे १०० खाटांचे महिलांचे रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. या रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम काम प्रगतिपथावर असल्याचे प्रा.डॉ. सावंत म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यानी कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, स्वातंत्र्यसैनिकांचे स्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी-कर्मचारी, विविध राजकीय पक्षाचे पहाधिकारी, पत्रकार चांधन व नागरिकांची भेट घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आधार शिक्षक हनमंत पडवळ यांनी मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news