

धाराशिव : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा राम तावरे (वय वर्षे 16) यास गट नं 52 मध्ये शेतात रात्री कडबाकुटी मशीनला स्पर्श होऊन विजेचा शॉक लागल्यामुळे जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल धाराशिव येथे दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
अत्यंत कष्टाळू होतकरू विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णा याने इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. सुट्टी असल्याने तो गावाकडे आला होता. शेतात काम करीत असताना त्याला शॉक लागून या दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे बोरगावसह परिसरात शोककळा पसरली आहे.