

तुळजापूर : कर्नाटकातील बिदर येथील पांडुरंग हुलाजीराव पाटील यांनी तुळजाभवानी देवीला ४७.९४ ग्रॅम वजनाची (सुमारे ३.५ लाख किमतीची) सोन्याची साखळी अर्पण केली. मंदिर संस्थांतर्फे त्यांचा देवीची प्रतिमा व साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे विश्वास कदम, गणेश मोटे, राकेश पवार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.