Dharashiv News : शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा रेल्वे पूल !

पाराशिव-तुळजापूर मार्गाचे काम वेगात : आमदार पाटील
Dharashiv News
Dharashiv News : शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा रेल्वे पूल !file photo
Published on
Updated on

A 106-meter railway bridge to be built in Shingoli!

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि त्याचा टप्पा असलेल्या शिंगोली जवळील नापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे ाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष गजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा ििधक लांबीचा १०६ मीटर लांचीचा पल स्पॅन पूल ठरणार असल्याची माहिती बचे उपाध्यक्ष तथा आमदार जिगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ४४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनचे नाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह वेल यांनी शिंगोली याठिकाणी प्रत्यक्ष या कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे.

यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गत शिंगोली येथे सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा भव्य पूल बांधण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या हा पूल अतिशय भव्य असून, दोन खांबांमधील अंतर तब्बल १०६ मीटर इतके असणार आहे.

एवढ्या मोठ्या अंतराचा सिंगल स्पॅन अस लेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल असल्याचे सांगितले जात आहे. पुढील ८-९ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून सध्या या ठिकाणी ड्रिलिंग आणि पायाभरणीचे काम वेगात सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ३ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर लॉन्चिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ८ ते ९ महिने लागणार आहेत. यासाठी आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

कामादरम्यान महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करून पुलाच्या उभारणीचे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे धाराशिवकरांच्या रेल्वे स्वप्नाला आता नवी गती मिळाली असून, स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव रेल्वेस्थानकाचेही काम प्रगतिपथावर

धाराशिव रेल्वे स्थानकापासून या रेल्वे ट्रॅकचे काम शिंगोलीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हा नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे, ज्याचा फायदा लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही होणार आहे. हा १०६ मीटरचा पूल या मार्गावरील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असेल. सध्या ड्रिलिंग सुरू असून पुढील काही महिन्यांत पुलाचा मुख्य सांगाडा उभा राहिलेला सर्वांना पाहायला मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news