परभणी : महातपुरी येथे अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभागाची धाड

परभणी : महातपुरी येथे अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभागाची धाड

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील महातपुरी येथे मंगळवारी (दि.१३) परभणी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने अवैध सावकारी प्रकरणी धाड टाकली. या कारवाईत कागदपत्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यातील अवैध सावकारांमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अवैध सावकारींबाबत तालुक्यातील दत्तवाडी येथील एका अर्जदाराने तक्रार दिली होती. जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलीस अधीक्षक रागसुधा आर, विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे, जिल्हा उपनिबंधक उमेशचंद्र हुसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निबंधक संदीप तायडे, एस.एम. कानसटवाड यांच्या पथकाने तालुक्यातील महातपुरी येथील राजूबाई मुलगीर, संभुदेव मुलगीर यांच्या घरी धाड टाकून मोठी कारवाई केली.

यावेळी कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. संबंधितांना त्यांची बाजू मांडण्यास संधी देण्यात आली असल्याचे कळते. सावकारी सिद्ध झाल्यास यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. या धाडसत्रात पथक सदस्य म्हणून एस. के. पवार, पी. जी. देखणे, जे. एस. तेरखेडकर, ए. एम. गोरे, बी. एस. कुरुडे, एम. के. सय्यद, एस. ए. कवळे, ए. पी. चाकोते, पी. आर. बाजगी यांच्या पथकाने सहभाग घेतला. दरम्यान, विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तींसोबत कोणत्याही प्रकारची आर्थिक देवाण-घेवाणीचे व्यवहार करू नये. आवश्यकता भासल्यास परवानाधारक सावकाराकडूनच कर्ज घ्यावेत, असे आवाहन सहाय्यक निबंधक संदीप तायडे यांनी केले आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news