

सोयगाव: शहरातील सोशल मीडियाच्या एका समूहावर मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या त्या युवकाविरुद्ध गुरुवारी रात्री अकरा वाजता सोयगाव पोलीस ठाण्यात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात सोशल मीडियावर संतोष नाना भामरे (रा आमखेडा सोयगाव वय ४६) यांनी गुरुवारी सायंकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल आ क्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या चा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे मराठा समाजाच्या संतप्त तरुणांनी रात्री नऊ वाजेपर्यंत सोयगाव पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडत संबंधिताविरुद्ध कारवाईची मागणी केली.
दरम्यान मराठा तालुका समन्वय विजय काळे यांनी रात्री सोयगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संतोष भामरे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राजू बर्डे करीत आहेत.