Zilla Parishad Election : सुधारित कार्यक्रमाने जिल्हा प्रशासनाची कोंडी

» जि. प. निवडणूक : अडीच हजार शिक्षकांच्या इलेक्शन ड्यूट्या रद्द करण्याची वेळ ▶ आता नवीन कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती, मतदानाच्या दिवशीच सीटीईटी परीक्षा
Zilla Parishad Election
सुधारित कार्यक्रमाने जिल्हा प्रशासनाची कोंडीfile photo
Published on
Updated on

Zilla Parishad Election: Time to cancel the election duties of two and a half thousand teachers

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची तयारी पूर्ण करून ठेवली होती. मात्र मतदान आणि मतमोजणीची तारीख बदलल्याने प्रशासनाची अडचण वाढली आहे. आता मतदानाच्या दिवशीच शिक्षकांची सीटीईटी परीक्षा आली आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी नियुक्त केलेल्या बारा हजार शिक्षकांपैकी अडीच हजार शिक्षकांची ड्यूटी रद्द करावी लागली आहे. आता त्या ठिकाणी इतर विभागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षण द्यावे लागणार आहे.

Zilla Parishad Election
पोलिस पुत्राच्या कुख्यात गँगचा निराला बाजार भागात राडा

राज्यात १६ जानेवारीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ७ रोजी मतमोजणी होणार होती. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी करून ठेवली. मतदानासाठी जिल्ह्यात बारा हजार कर्मचारी नियुक्त करून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. मात्र आता निवडणुकीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान आणि ९ फेब्रुवारी मतमोजणी होणार आहे.

मात्र ७ तारखेलाच केंद्र सरकारकडून शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाला सीटीईटी परीक्षा देणाऱ्या अडीच हजार शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी लागली आहे. बारा हजारांपैकी अडीच हजार शिक्षकांची ड्यूटी रद्द झाल्याने आता त्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षणही द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे.

Zilla Parishad Election
Sambhajinagar Crime News : हॉटेल हयातमध्ये घटस्फोटित पत्नीला पतीची मारहाण

मात्र ७ तारखेलाच केंद्र सरकारकडून शिक्षकांसाठी सीटीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाला सीटीईटी परीक्षा देणाऱ्या अडीच हजार शिक्षकांची इलेक्शन ड्यूटी रद्द करावी लागली आहे. बारा हजारांपैकी अडीच हजार शिक्षकांची ड्यूटी रद्द झाल्याने आता त्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी लागणार आहे. शिवाय या कर्मचाऱ्यांना नव्याने प्रशिक्षणही द्यावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाची अडचण झाली आहे.

मध्य प्रदेश, नांदेडच्या ईव्हीएम आल्या

जिल्ह्यातील ६३ गटांतील आणि १२६ पंचायत समिती गणातील २ हजार २८२ मतदान केंद्रांवर आता ७ फेब्रुवारीला सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत मतदान होणार आहे. २४८९ पोस्टल मतदार आहेत. तर १८ लाख ७३ हजार ५३ एकूण मतदार आहेत. यात ९ लाख ७९ हजार पुरुष व ८ लाख ९३ हजार ७७८ महिला मतदार आहेत. ४१ मतदार तृतीयपंथीय आहे. निवडणुकीसाठी नांदेड, हिंगोली, मध्य प्रदेश, धाराशिवमधल्या ईव्हीएम आणण्यात आल्या आहेत.

निवडणुकीची तयारी पूर्ण झाली होती. कर्मचारीही नियुक्त करण्यात आले होते. मात्र मतदानाची तारीख बदलल्याने आणि त्याच दिवशी सीटीईटी परीक्षा आल्याने अडीच हजार शिक्षकांच्या ड्यूटी रद्द कराव्या लागल्या आहेत. त्या जागी आता इतर विभागांतील कर्मचारी नियुक्त केले जात आहेत.
संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news