Chhatrapati Sambhajinagar news: सिसारखेड्यात विष प्राशन करुन तरुणाने जीवन संपवले; पोलिसांवर गंभीर आरोप

एका पंचवीस वर्षीय तरुणाने शेतात विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना तालुक्यातील सिसारखेडा येथे शनिवारी (दि. १७) रात्री घडली.
Chhatrapati Sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar newsFile Photo
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar news:

सिल्लोड : एका पंचवीस वर्षीय तरुणाने शेतात विष प्राशन करून जीवन संपवले. ही घटना तालुक्यातील सिसारखेडा येथे शनिवारी (दि. १७) रात्री घडली. दरम्यान, पोलिसांच्या त्रासामुळे तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संतोष ठानसिंग राऊत (वय २५, रा. सिसारखेडा) असे मृताचे नाव आहे. संतोषने शनिवारी रात्री शेतातील घरी विष प्राशन केले व ही माहिती फोन करून मित्रांना दिली. माहिती मिळताच मित्रांनी त्याला शेजारील नागरिकांच्या मदतीने सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Chhatrapati Sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar news: धक्कादायक! प्रेमविवाहानंतर पतीनेच पत्नीसोबतच्या शारीरिक संबंधांचे व्हिडिओ नातेवाइकांना पाठवले

संतोषला वारंवार ठाण्यात बोलावून चौकशी करीत मानसिक त्रास दिल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलले, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे. सिसारखेडा येथून एक मुलगी बेपत्ता आहे. सदर मुलीला गावातीलच एका तरुणाने पळवून नेले आहे. या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस तपास करीत आहेत. मुलगी पळवून नेणारा तरुण संतोषचा मित्र आहे. यामुळे पोलिसांनी संतोषला ठाण्यात बोलावून चौकशी केली.

काही माहिती नसतानाही पोलिसांनी त्याला मानसिक त्रास दिल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. रविवारी (दि. १८) सकाळी मृत तरुणाचे नातेवाईक शहर पोलिस ठाण्यात जमल्याने काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Chhatrapati Sambhajinagar news
Chhatrapati Sambhajinagar News : देवळाणा येथे तरुण शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news