Knife Attack : मुलाच्या हळदीत 'पार्टी'चे पैसे न दिल्याने तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

गुंडांचा भावसिंगपुऱ्यात राडा; लग्न उधळून लावण्याची धमकी
Knife Attack
Knife Attack : मुलाच्या हळदीत 'पार्टी'चे पैसे न दिल्याने तरुणावर चाकूने जीवघेणा हल्लाfile photo
Published on: 
Updated on: 

Youth attacked with a knife a life-threatening assaultafter failing to pay for a 'party' during a boy's haldi ceremony

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुलाच्या लग्नानिमित्त सुरू असलेल्या हळदीच्या कार्यक्रमात पार्टीसाठी पैसे न दिल्याच्या किरकोळ कारणावरून टोळक्याने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला. किरणला खतम कर म्हणत डोक्यात चाकू खुपसून गंभीर जखमी केले, तर लग्न होऊ न देण्याची धमकी देत रिक्षाची तोडफोड केली.

Knife Attack
Sant Eknath Sugar Factory : संत एकनाथ साखर कारखान्यावरील प्रशासक नियुक्तीला हायकोर्टाची स्थगिती

ही घटना भावसिंगपुरा येथील आमेन चौक, भीमनगर भागात मंगळवारी (दि. २४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जयकांत भालेराव, ऋतीक आव्हाड आणि अनिकेत पाटोळे या तिघांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापारी संदीप हिरामण आसुंड (४८) यांचा मुलगा साहील याचे बुधवारी (दि. २५) लग्न असल्याने सोमवारी रात्री घरी हळदीचा कार्यक्रम होता. सायंकाळी सातच्या सुमारास गल्लीतील जयकांत व ऋतीक यांनी पार्टीसाठी पैसे मागितल्याने संदीप यांनी जयकांतला, तर नंतर आलेल्या अनिकेतला प्रत्येकी ५०० रुपये दिले.

Knife Attack
Harsul Lake : हर्सूल तलावाचा साठा अवघ्या सहा फुटांवर

हळद आटोपल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास ऋतीकने संदीप यांना घराबाहेर बोलावून त्या दोघांना पैसे दिले, मला का दिले नाही? असे म्हणत मारहाण सुरू केली. बाहेर उभ्या असलेल्या जयकांत व ऋतीकने संदीप यांच्या छातीवर सिमेंटचे गट्टू फेकून मारले. आरडाओरडा ऐकून भाऊ किरण व पाहुणे बाहेर धावले असता, जयकांतच्या सांगण्यावरून अनिकेतने किरण यांच्या डोक्यात चाकूने वार करून त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाडले. त्यानंतर पसार झालेल्या जयकांतने पुन्हा चाकू घेऊन येत तक्रार दिल्यास तुझ्या मुलाचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी देत रिक्षाची काच फोडली. पुढील तपास उपनिरीक्षक शेंबाळे करत आहेत.

तिघे सराईत

आरोपी जयकांत भालेराव, ऋतिक आव्हाड दोघे खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष सुटलेले आहेत. तर अनिकेतवर जीवघेणा हल्ल्याचा तर तिघांविरुद्ध मारहाणीचेही काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.