Chhatrapati Sambhajinagar|मुक्त विद्यापीठाच्या उत्तरपत्रिकांची बनावट आयडीद्वारे तपासणी कमी करा

YCMOU answer sheet evaluation scam- प्राचार्य, प्राध्यापकांसह ४८ जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Yashwantrao Chavan Maharashtra Open University
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठPudhari News Network
Published on: 
Updated on: 

गंगापूर : विद्यार्थ्यांच्या भविष्याचा पाया असलेल्या शिक्षण क्षेत्रात नेमके चाललेय तरी काय, असा संतप्त सवाल उपस्थित करणारा धक्कादायक प्रकार गंगापूर तालुक्यात समोर आला आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेत चक्क बनावट आयडी, अधिकृत परीक्षकांच्या बायोमेट्रिक अंगठ्याचा गैरवापर आणि अनधिकृत शिक्षकांकडून मूल्यमापन केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती शाहू महाविद्यालयातील कॅप सेंटरवर तब्बल १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांची अनधिकृत तपासणी करून मानधनाचा अपहार केल्याप्रकरणी प्राचार्य, प्राध्यापक आणि तांत्रिक सहाय्यकांसह ४८ जणांविरुद्ध शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
Chhatrapati Sambhajinagar Waluj municipal corporation status| वाळूजमध्ये नवी महापालिका की नगरपरिषद?

विद्यापीठाचे उपकुलसचिव तथा परीक्षा युनिट-३ व केंद्रीय मूल्यमापन कार्यक्रम कक्षाचे अधिकारी मनोज नारायण घंटे यांनी याप्रकरणी शिल्लेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
Chhatrapati Sambhajinagar father throws children in canal|चॉकलेट-वडापावचे आमिष, वडिलाने २ चिमुकल्यांना कालव्यात फेकले!

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ; फेरतपासणीची मागणी

शिक्षण व्यवस्थेवर विश्वास ठेवून विद्यार्थी परीक्षा देतात; मात्र त्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यमापनच बनावट आयडी आणि बोगस व्यक्तींच्या माध्यमातून झाल्याने विद्यार्थ्यांच्या निकालावर परिणाम झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आता या १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांची फेरतपासणी होणार का आणि विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास जबाबदारी कोणाची, याकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले.

असा झाला गैरप्रकार

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, ९ जून २०२५ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत छत्रपती शाहू महाविद्यालयातील कॅप सेंटरवर उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरू होते. या प्रक्रियेत नियमांना अक्षरशः हरताळ फासण्यात आला. काही अधिकृत परीक्षक प्रत्यक्ष केंद्रावर उपस्थित नसतानाही त्यांच्या बायोमेट्रिक अंगठ्याचा गैरवापर करून उत्तरपत्रिका तपासणीची लिंक उघडण्यात आली. इतकेच नव्हे, तर अधिकृत परीक्षकांच्या नावाने बनावट आयडी तयार करून अनधिकृत शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेतल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

प्राचार्य, संचालकांसह ४८ जण आरोपी

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये १५ नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री शिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कॅप सेंटर संचालक प्रा. मधुकर साठे, प्राचार्य डॉ. संदीप राजाभाऊ धिरडे, तांत्रिक सहाय्यक दादासाहेब कन्हाळे, अंकुश गंगाराम पडाळे, प्रा. विशाल अशोकराव चपटे यांच्यासह एकूण ४८ जणांना आरोपी करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.

विषय तज्ज्ञ नसतानाही तपासले पेपर; मानधनाचाही अपहार

ज्या शिक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासून घेण्यात आल्या, ते संबंधित विषयांचे तज्ज्ञ नव्हते आणि विद्यापीठाकडून अधिकृत परीक्षक म्हणून नियुक्तही नव्हते. अशा पद्धतीने १९ हजार २३१ उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करण्यात आले. या कामापोटी विद्यापीठाकडून २ लाख ७६ हजार ४१८ रुपये मानधन घेण्यात आले. त्यातील काही रक्कम अनधिकृत शिक्षकांना देऊन उर्वरित रकमेचा परस्पर अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.