

Chhatrapati Sambhajinagar news
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमध्ये चुकीच्या वैद्यकीय उपचारांचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका युनानी डॉक्टरने आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन चुकीची ॲलोपॅथी औषधे दिल्यामुळे २८ वर्षीय महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर झाली आहे.
शहाबाजार परिसरातील 'अश-शिफा' क्लिनिकमधील डॉक्टर मोहम्मद इब्राहिम सौदागर यांच्याविरोधात शहर चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चुकीच्या औषधोपचारांमुळे महिलेच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या असून, ती गेल्या २०३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर जीवन-मरणाशी झुंज देत आहे. पीडित महिलेच्या पतीने उपचाराचा खर्च भागवण्यासाठी स्वतःचा प्लॉट आणि वाहने विकून लाखो रुपये खर्च केले आहेत. वैद्यकीय समितीच्या अहवालानंतरच संबंधित डॉक्टरवर ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
एका दुसऱ्या घटनेत पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी एका आई आणि भोळसर तरुण मुलाची भेट तब्बल आठ महिन्यांनंतर घडवून आणली. मुलाला पाहताच आईला अश्रू अनावर झाले. हा तरुण हा गेल्या आठ महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध पोलिस घेत होते. हा तरुण एक दिवस घरातून बाहेर गेला होता, परंतु तो घरी परतलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी केला, पण तो सापडत नव्हता. त्याला शोधण्याचा प्रचंड खटाटोप पाचोड येथील बालाजीनगर भागातील स्थानिक नागरिकांनी गुरुव ारी (दि.२) संध्याकाळी नऊ वाजता एका युवकास चोर समजून पाचोड पोलिस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले होते.