सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर महिलांचा संताप

दूषित पाणी, अनिश्चित वेळेचा त्रास : विभाग कार्यालयाला घातला घेराव
sambhajinagar news
सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर महिलांचा संतापfile photo
Published on
Updated on

Women's anger over irregular water supply in CIDCO

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सिडको एन-७ परिसरातील पाणीपुरवठा अनियमित होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, पाण्याची वेळ निश्चित नसणे, दूषित पाणी मिळत असल्याच्या समस्यांमुळे संतप्त झालेल्या महिलांनी मनीष नरवडे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा विभाग कार्यालयाला घेराव घालत आंदोलन केले.

sambhajinagar news
Contaminated Water : नाल्यालगतच्या विहिरीतील दूषित पाण्याचा घराघरांत पुरवठा

सिडकोतील प्रभाग क्र. ११ मधील संभाजी कॉलनी, ई सेक्टर व एफ सेक्टर या भागांत गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठ्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातच पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास पाणी येत असल्याने विशेषतः महिलांची मोठी गैरसोय होत आहे. या आंदोलनात आकाश साबळे, द्वारका रगडे, माटे मावशी, गंगा गवारे, आभणे मावशी, शोभा काकडे, मीना मिसाळ, गया साळवे, सरला कोलते, संगीता गडकर, अलका कोतकर, सुवर्णा कोलते, शोभा महाजन यांसह अनेक महिला सहभागी झाल्या. नागरिकांनी पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रशासनाकडे केली.

sambhajinagar news
'पुढारी'च्या वृत्तमालिकेची दखल; महापौरांकडून तपासणीचे आदेश

नियमित पाणी देण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांच्या नेतृत्व-ाखाली महिला व नागरिकांनी सिडको पाणीपुरवठा विभागाच्या झोन क्र. ३, ४ व ५ कार्यालयाला घेराव घातला. नियमित पाणी द्या, अनियमित पुरवठा बंद करा, दूषित पाण्याला आळा घाला अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी मोठ्या सख्येने महिलांची उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news