

पैठण : पैठण शहरातील एका महिलेच्या घरात घुसून महिलेला जिवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना घडली होती. ही घटना 29 नोव्हेंबर 2023 दिवशी घडली होती. या प्रकरणी पैठण न्यायालयाने अक्षय नवनाथ पवार (रा. गौतमनगर) या आरोपीला दोषी ठरवून दोन वर्ष कठोर करावासाची शिक्षा सुनावली आहे.
या बाबात अधिक माहिती अशी की, मागील वर्षी पैठण शहरात २९/११/२०२३ रोजी एका महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता. अक्षय पवारने पिडीत महिलेला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पीडितेकडून पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. सदरील प्रकरणाचा तपास करून आरोपी विरुद्ध पैठण प्रथमवर्ग न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते. न्यायालयाने गुरुवारी (दि.२४) न्यायदंडाधिकारी ए.सी रोकडे सदरील खटल्याचा अंतिम निकाल देत आरोपी अक्षय पवार दोषी ठरवून दोन वर्ष कठोर करावासाची शिक्षा सुनावली आणि एक हजार रुपये दंडाची रक्कम न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
या प्रकरणाचा तपास ग्रामीण पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश माळी यांनी तपास करून सदरील आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी वकील अनिल शिंपी यांनी खटल्यांचे कामकाज पाहून न्यायालयात सरकारी पक्षाची बाजू मांडली कोर्ट परैवी अधिकारी मुकुंद नाईक यांनी काम पाहिले आहे.