मळणीयंत्रात महिलेचे केस अडकून शीर झाले धडावेगळे

मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू; सिल्लोड तालुक्यातील वसईची घटना
Woman dies after her hair gets stuck in threshing machine
मळणीयंत्रात महिलेचे केस अडकून शीर झाले धडावेगळेFile Photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्तसेवा

मळणीयंत्रात मका काढत असताना अचानक मशीनमध्ये डोक्याचे केस अडकून एका मजुरी करणाऱ्या महिलेचे शिर धडावेगळे झाल्याने तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना सिल्लोड तालुक्यातील वसई येथे घडली. कोकिळाबाई संजय गवळी असे मृत महिलेचे नाव आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, वसई येथे काल (गुरूवार) दुपारी गावातील फकीरराव सनान्से यांच्या शेतात मका काढणीचे काम सुरू होते. यासाठी कोकिळाबाई गवळीसह इतर मजुर महिला तेथे काम करीत होत्या. मका मशीनमध्ये टाकताना अचानकपणे कोकिळाबाई यांचे केस मशीमध्ये अडकले. यामुळे वेगाने त्या मशीनमध्ये ओढल्या गेल्या. अत्यंत गरीब असलेल्‍या कोकिळाबाई आणि संजय गवळी या दाम्पत्याकडे केवळ दीड एकर शेती आहे. शेतीतून मिळणारे उत्‍पन्न चरितार्थासाठी पुरेसे नसल्‍याने दोघेही पती-पत्नी रोज मजुरीची कामे करतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दोन्ही मुलींचे विवाह झालेले असून, त्यांचा मुलगा नुकताच होमगार्डमध्ये भरती झाला आहे. त्यामध्ये परिवारात आनंदाचे वातावरण होते. दरम्‍यान या घडलेल्‍या दुर्देवी घटनेमुळे या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news