Abdul Sattar : दुष्काळात शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक कशासाठी?

अनावश्यक कागदपत्रे, जाचक अटी थांबविण्याची आमदार अब्दुल सत्तार यांची मागणी
Abdul Sattar
Abdul Sattar : दुष्काळात शेतकऱ्यांची बँकांकडून अडवणूक कशासाठी?file photo
Published on: 
Updated on: 

Why are farmers being harassed by banks during a drought?

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : दुष्काळाने शेतीचे अर्थकारण कोलमडले, हातात पैसा नाही, उत्पन्नाची शाश्वती नाही आणि पुढील हंगामासाठी पैशांची जुळवाजुळव करण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पीककर्जाचे पुनर्गठन आणि नूतनीकरण करताना बँकांकडून कागदपत्रांचा जाच केला जात असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. एकाच कर्जाच्या नूतनीकरणासाठी सातबारा उतारा, फेरफार नकलांची मागणी करून शेतकऱ्यांना तहसील कार्यालयाच्या चकरा मारायला लावणे थांबवावे, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Abdul Sattar
Marathwada Graduates' Constituency Election : पाटील यांना साबळे, घुगेंची ८७५४ मते मिळाली

सध्या सिल्लोड-सोयगावसह जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. पिकांचे नुकसान, घटलेले उत्पन्न आणि वाढता आर्थिक ताण यामुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. अशा वेळी पीककर्जाचे पुनर्गठन करून घेण्यासाठी किंवा जुन्या कर्जाचे नूतनीकरण करण्यासाठी बँकांकडे गेल्यानंतर विविध कागदपत्रांची मागणी केली जात असल्याने त्यांची धावपळ वाढत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच पीककर्ज घेतलेल्या आणि केवळ त्याच कर्जाचे नूतनीकरण करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांकडूनही सातबारा उताऱ्यावरील फेरफार नकलांची मागणी केली जात असल्याचे आमदार सत्तार यांनी पत्रात नमूद केले आहे.

बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची मागणी

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची गरज असताना कर्जाच्या प्रक्रियेत त्यांची अडवणूक होणे अन्यायकारक आहे. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बँकांना स्पष्ट निर्देश देऊन, यापूर्वीच्या पीककर्जाच्या नूतनीकरणासाठी अनावश्यक फेरफार नकलांची मागणी करू नये, तसेच शेतकऱ्यांवर जाचक अटी लादू नयेत, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली आहे.

दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा वेळ, पैसा आणि श्रम कागदपत्रांच्या पूर्ततेत खर्च होऊ नयेत. कर्ज नूतनीकरणाची प्रक्रिया सुलभ करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा आणि संबंधित यंत्रणेने याबाबत त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Abdul Sattar
कत्तलीसाठी कंटेनरमधून नेल्या जाणाऱ्या २३ गोवंशांची सुटका

प्रत्येक कागदासाठी शेतकऱ्यांची दमछाक

फेरफार नकलांसाठी शेतकऱ्यांना तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. तहसील कार्यालयात आवश्यक मनुष्यबळाचा अभाव असल्याने कागदपत्रे मिळविताना विलंब होत असून, शेतकऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. विविध कागदपत्रांसाठी पैसे खर्च करावे लागत असल्याच्या तक्रारी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्याचेही सत्तार यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.