Water Supply : हायड्रोलिक चाचणीनंतरच जलवाहिन्यांतून नळ कनेक्शन

मनपा आयुक्तांचे एमजेपीला निर्देश; १२ जूनच्या मुहूर्तासाठी तयारी युद्धपातळीवर
Water Connection
Water Supply : हायड्रोलिक चाचणीनंतरच जलवाहिन्यांतून नळ कनेक्शनPudhari File Photo
Published on
Updated on

Water Supply: Tap Connections from Water Pipelines Only After Hydraulic Testing

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या विविध वसाहतींमध्ये अंतर्गत पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या प्रत्येक जलवाहिनीची हायड्रोलिक चाचणी होणे आवश्यक आहे. या चाचणीनंतरच अंतर्गत जलवाहिन्यांना पाणीपुरवठा सुरू करून नळ कनेक्शन देण्यात यावेत, असे निर्देश महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (एमजेपी) अधिकाऱ्यांना दिल्याचे महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी बुधवारी (दि. २७) सांगितले.

Water Connection
Sambhajinagar Water Project : हायड्रोलिक चाचणी वगळल्याने पुन्हा निखळली वेल्डिंग

शहराला येत्या १२ जूनपासून नव्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीतून ५० एमएलडी वाढीव पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत हे सतत पाठपुरावा करत आहेत. तर एमजेपीचे अधिकारी कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीकडून काम पूर्ण करून घेत आहेत, असे सांगत महापालिका आयुक्त येडगे म्हणाले की, नक्षत्रवाडीहून शहरातील जलकुंभांपर्यंत ११०० मिमी व्यास, १५०० मिमी व्यास आणि २००० मिमी व्यास क्षमतेच्या जलवाहिन्यातून पाणी आणले जाणार आहे.

यात पहिल्या टप्प्यात १५०० आणि २००० च्या जलवाहिन्यांवरील शिल्लक गॅप जोडणीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्यात येत आहे. १५०० चे काम अंतिम टप्प्यात असून, या नव्या आणि जुन्या जलवाहिन्यांतून शहरात १२ जूनपासून ४० ते ५० एमएलडी पाणी आणले जाणार आहे.

Water Connection
Water Supply : सिडकोला १५०० च्या जलवाहिनीतून होणार पुरवठा

सध्या शहरात कार्यान्वित असलेल्या जुन्या जलकुंभांमध्येच पाणी आणण्यावर भर आहे. त्यानंतर आठवडाभरात २००० मिमीची जलवाहिनी चार्ज करून त्यातून नव्याने तयार केलेल्या जलकुंभांमध्ये पाणी घेतले जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. या कामात कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीचे अंतर्गत पाणी वितरणांच्या जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष झाले.

हे काम अजूनही धिम्या गतीनेच सुरू आहे. मात्र आता या कामाकडे लक्ष केंद्रित करून अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यावर भर देण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तसेच अंतर्गत जलवाहिन्यातून पाणीपुरवठा सुरू करण्यापूर्वी त्या जलवाहिन्यांची हायड्रोलिक चाचणी घेण्याचे आदेशही एमजेपीला दिले आहेत. त्यानंतरच या जलवाहिन्यांना नळ कनेक्शन देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news