Water Scarcity : जल जीवन मिशनचा जिल्ह्यात बट्ट्याबोळ

कोट्यवधी खर्चुनही गावोगावी पाण्याची टंचाई कायम
Jal Jeevan Mission / जल जीवन मीशन
Jal Jeevan Mission / जल जीवन मीशनFile Photo
Published on
Updated on

Water scarcity persists across villages despite the expenditure of crores

शुभम चव्हाण

छत्रपती संभाजीनगर : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनेचा जिल्ह्यात अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दररोज ५५ लिटर शुद्ध पाणी देण्याचे स्वप्न दाखविण्यात आले; मात्र प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये नागरिक आजही पाण्यासाठी भटकंती करत आहेत. प्रशासन एकूण १,९६४ योजनांपैकी ७०२ पूर्ण झाल्याचा दाव करत असले तरी, वास्तवात एकही योजना जल जीवन मिशनच्या नियमाप्रमाणे झाली नसल्याचे आरोप स्थानिकांचे आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी खर्चुनही प्रशासक काळातील भोंगळ कारभार, हलगर्जीपणा आणि कथित घोटाळ्यांमुळे संपूर्ण योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Jal Jeevan Mission / जल जीवन मीशन
Beed news | काम कागदावरच; पाणी मुरले कुठे..?

जिल्ह्यात एकूण १,९६४ योजना मंजूर असून, त्यापैकी ७०२ योजना पूर्ण झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाने केला. तर ४६२ योजना अद्याप प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले होते. महर घर जलफअंतर्गत ४ लाख ८८ हजार ८४ नळजोडण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ४ लाख २६ हजार १६६ जोडण्या पूर्ण झाल्याचेही सांगितले जात होते.

मात्र, या आकडेवारीवर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी पदभार स्वीकारताच थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अनेक ठिकाणी नळजोडण्या पूर्ण दाखविल्या असल्या तरी प्रत्यक्षात पाणी पोहोचलेले नाही. काही ठिकाणी ते ८० टक्के काम दाखविल्याचे प्रकार समोर २० ते ३० टक्के काम पूर्ण असताना ७० केवळ होता.

Jal Jeevan Mission / जल जीवन मीशन
Hingoli News : घोटादेवी येथे जल जीवन मिशनचा बोजवारा!

या सर्व योजनांचा सखोल आढावा घेऊन संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, अधिकाऱ्यांची दिरंगाई, ठेकेदारांची मनमानी, प्रत्यक्ष कामातील कथित घोटाळे, नियोजनाचा अभाव तसेच आज काम सुरू करू, उद्या काम सुरू करू अशी ठेकेदारांकडून सरपंच, ग्रामसेवक आणि गावकऱ्यांना दिली जाणारी आश्वासने याला अध्यक्ष आवर घालणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

योजनेतील दोषींवर कारवाई होणार का? आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील जल जीवन मिशनचे पाणी प्रत्यक्षात ग्रामीण भागातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचणार का? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यातील सर्व कामांची चौकशी करणार जिल्ह्यातील जल जीवन मिशनची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करून प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचविण्याचा आमचा उद्देश आहे. आतापर्यंत काही कामांत हलगर्जीपणा झाला असेल; मात्र आता हलगर्जीपणा करणाऱ्यांना माफी नाही. जिल्ह्यातील सर्व ११६४ कामांची चौकशी करणार आहे. तसेच भगूर गावात सरपंच व ठेकेदार यांच्यात झालेल्या बाचाबाची प्रकरणात संबंधित व्यक्ती मुख्य ठेकेदार आहे की? पोटठेकेदार, याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
अविनाश गलांडे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
ठेकेदाराकडून सरपंच, गावकऱ्यांना दमदाटी ! 66 जल जीवन मिशन अंतर्गत आमच्या भगूर गावातील पाण्याच्या टाकीचे काम गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर ठेकेदारांनी काम सुरू करण्याचे सांगितले; मात्र दोन दिवसांतच काम बंद करून अरेरावीची भूमिका घेतली. तसेच पुढील सहा महिने वैजापूर तालुक्यात काम करणार नाही, काय करायचे ते करा, अशी भाषा वापरत पोलिसांची धमकीही देण्यात आली. गावाच्या विकासकामासाठी पाठपुरावा करणे चुकीचे नसताना ठेकेदारांकडून अशी दमदाटी होत असेल, तर आम्ही दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न आहे.
- जनार्दन चव्हाण, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यमान सरपंचांचे पती, भगूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news