Voters anger on ballot paper over party switching| 'कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलतात, बस का ब्रो..' मतपत्रिकेतून संताप

'कपडे बदलल्याप्रमाणे पक्ष बदलतात, बस का ब्रो..' मतपत्रिकेतून व्यक्त केला मतदारांनी संताप
Voters anger on ballot paper over party switching
Voters anger on ballot paper over party switching
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर-मराठवाडा पदवीधर मतदार संघात तीन-तीनवेळी आमदार केले. मात्र, कपडे बदलल्याप्रमाणे तुम्ही पक्ष बदलला. पदवीधरांचा आवाज देखील होण्याचा प्रयत्न तुम्ही केला नाही. बस का ब्रो, असे म्हणत मराठवाड्यातील बहुतांश पदवीधर मतदारांनी मतपत्रिकेसोबत चिठ्ठया ठाकून संताप व्यक्त केला आहे.

मराठवाडा पदवीधर मतदार संघाची निवडणूक यंदा चांगलीच रंगतदार ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमनेसामने निवडणूक रिंगणात उभे राहिल्याचे दिसून आले. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतरची ही पहिलीच पदवीधर मतदार संघाची निवडणूक असल्याने महायुती आणि महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी कॉग्रेसलाच जागा सोडण्यात आली होती. परंतु, असे असले तरी ठाकरे गटाने महाविकास आघाडीत उमेदवार दिला. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे चित्र निर्माण झाले होते. परंतु, असे असतानाही ठाकरे गटाला तब्बल चौथ्या क्रमांकावर जावे लागले.

दरम्यान, या निवडणुकीत बहुतांश पदवीधर मतदारांनी टाकाटिप्पणी करणारे पत्र मतपत्रिकेसोबत जोडून मतपेटीत टाकले होते. मतपेटी उघडल्यानंतर मतपत्रिकेसोबत या चिठ्ठयादेखील आढळल्या. त्यात कपडे बदल्याप्रमाणे पक्ष बदलणाऱ्यांनो आम्ही तुम्हाला माफ करणार नाही. तीनतीन टर्म तुम्हाला सत्तेत पाठविले, मात्र तरीही तुम्ही आमच्यासाठी काहीच केले नाही. आमचा आवाज होण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही. बस का ब्रो, यासह शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या समस्येकडेही पदवीधर मतदार संघातून विजयी झालेले आमदार मागणी करूनही लक्ष देत नाहीत, असेही चिठ्ठयांमध्ये लिहिल्याचे अडळले. या संतापामुळे पदवीधर मतदारांचा रोष दिसून येत आहे.

Voters anger on ballot paper over party switching
Sambhajinagar Accident | नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रक - दुचाकीची धडक; केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानासह तरूण जागीच ठार

अधिकारी आवक

मतपत्रिकेतून असा संताप व्यक्त करण्याची पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील ही पहिलच वेळ नाही. यापूर्वी देखील अनेकांनी मतपत्रिकेत काही ना काही लिहिल्याचे अढळले आहे. परंतु, अशा प्रकारे संताप पहिल्यांदाच व्यक्त झाल्याने मतमोजणी अधिकारी-कर्मचारी देखील आवक झाले.

Voters anger on ballot paper over party switching
Graduate Constituency Election- छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news