Viral video: 'यारा तेरी यारी को...! सरकारी खुर्चीवर बसून गाणे गाणं अधिकाऱ्याला भोवलं, बदलीनंतर निरोप समारंभावेळी तहसीलदारावर निलंबनाची कारवाई

Chhatrapati Sambhajinagar Tehsildar viral video latest News: मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तातडीने निलंबन करण्याचे दिले आदेश,राज्यात शासकीय अधिकाऱ्यावर पहिल्यांदाच अशाप्रकारे कारवाईची घटना
Chhatrapati Sambhajinagar Tehsildar
Chhatrapati Sambhajinagar Tehsildar Pudhari Photo
Published on
Updated on

Government officer singing song on government chair suspended

छत्रपती संभाजीनगर : शासकीय अधिकाऱ्याने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असावी. निरोपाच्या कार्यक्रमात तहसीलदाराच्या खुर्चीवर बसून गाणे गाण्याचा मोह एका तहसीलदाराला चांगलाच अंगलट आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरल्यानंतर, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने दखल घेत संबंधित तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.

उमरीचे (नांदेड) तत्कालीन व लातूर जिल्ह्यातील रेणापूरचे विद्यमान तहसीलदार प्रशांत थोरात यांना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ (१) नुसार ही शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

तहसीलदार प्रशांत थोरात यांची उमरी (नांदेड) येथून लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात २९जुलै २०२५ रोजी बदली झाली होती. ३१ जुलै २०२५ ते रेणापूरचे तहसीलदार म्हणून त्यांनी पदभार स्विकारला होता. त्यांच्या बदलीच्या पार्श्वभूमिवर उमरी येथील तहसील कार्यालयात निरोप समारंभात ठेवण्यात आला होता. यावेळी प्रशांत थोरात यांनी तहसीलदारांच्या खुर्चीत बसून ‘याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना’ हे फिल्मी गीत अंगविक्षेप करीत गायले होते. उपस्थित सहकाऱ्यांपैकी कोणीतरी याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. एका जबाबदार पदावरील अधिकाऱ्याने खुर्चीवर बसून अशाप्रकारे गाणे गाणे हे शासकीय पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारे नाही, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. या प्रकारामुळे शासनाची प्रतिमा मलीन होत असल्याची गंभीर दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना...'; बदलीनंतर निरोप समारंभावेळी गायलं गाणे

प्रशांत थोरात यांची नांदेडच्या उमरी तालुक्यातून लातूरच्या रेणापूर येथे २९ जुलै रोजी तहसीलदार म्हणून बदली झाली. थोरात यांना उमरी येथील पदावरून ३० जुलै रोजी कार्यमुक्त करण्यात आले. उमरी येथे थोरात यांच्यासाठी ८ ऑगस्टला निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले, जिथे त्यांनी खुर्चीवर बसून गाणे गायले. या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महसूल मंत्र्यांच्या आदेशानंतर विभागीय आयुक्तांनी प्रशांत थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

सोशल मीडियावरील वावर अधिकाऱ्यांसाठी धोक्याची घंटा?

या प्रकरणामुळे शासकीय अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर कसे वावरावे, याबाबत एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. शासकीय पद हे केवळ अधिकारच नव्हे, तर एक मोठी जबाबदारी असते. या पदाची प्रतिष्ठा जपणे हे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य मानले जाते. थोरात यांच्यावरील कारवाई ही इतर अधिकाऱ्यांसाठी एक इशारा मानला जात आहे. सोशल मीडियाच्या काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्यातील रेषा पुसट होत असताना, शासकीय अधिकाऱ्यांनी अधिक सजग राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news