Sambhajinagar News : पोलिसांचा रूट मार्च

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शहरासह वेरूळ येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पोलिसांचा रूट मार्चfile photo
Published on
Updated on

Verul Police Route March

वेरुळ, पुढारी वृत्तसेवा : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शहरासह वेरूळ येथे पोलिस प्रशासनाच्या वतीने रूट मार्च काढण्यात आला. सहायक पोलिस अधीक्षक (उपविभाग कन्नड) यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले.

Sambhajinagar News
Jalna Crime News : धारदार शस्त्रासह युवक जेरबंद, मुद्देमाल जप्त

रूट मार्चमध्ये १ पोलिस निरीक्षक, ८ पोलिस अधिकारी, ५० पोलिस अंमलदार, ५० होमगार्ड तसेच ४६ राज्य राखीव पोलिसदलाचे जवान सहभागी झाले होते. पोलिसांचा ताफा शहरातील प्रमुख मार्ग, बाजारपेठा तसेच संवेदनशील भागातून फिरला. यावेळी नागरिकांनीही रूट मार्चला सकारात्मक प्रतिसाद देत पोलिस प्रशासनाच्या तयारीचे स्वागत केले.

ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर आक्षेपार्ह अथवा वादग्रस्त पोस्ट टाकू नयेत तसेच कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले.

Sambhajinagar News
illegal firecracker factory raid : बेकायदेशीर फटाके कारखान्यावर धाड, लाखोंचा स्फोटक साठा जप्त

याशिवाय, बकरी ईदचा सण शांततेत आणि उत्साहात साजरा करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इश-ाराही पोलिस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news