Nagarparishad Election : तीसगावात वंचित बहुजन आघाडीचा जल्लोष

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळाले.
Nagarparishad Election
Nagarparishad Election : तीसगावात वंचित बहुजन आघाडीचा जल्लोषFile photo
Published on
Updated on

Vanchit Bahujan Aghadi celebrates in Tisgaon

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळाल्याने वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद पश्चिम तालुका व जिल्ह्याच्या वतीने रविवारी (दि. २१) तीसगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वाटप करून जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रमुख अॅड. बाळासाहेब आंबेडकर व निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांचे अभिनंदन करण्यात आले.

Nagarparishad Election
Kannad Municipal Council : कन्नड नगरपरिषद काँग्रेसकडे

दरम्यान, सुरुवातीला चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा महासचिव अंजन साळवे, प्रवीण हिवाळे, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ महापुरे, जिल्हा संघटक खुशाल बनसोडे, प्रसिध्दी प्रमुख भावराव गवई, अॅड. नामदेव सावते, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अंकुश जाधव, माजी तालुका महासचिव एस. पी. हिवराळे, प्रेम बनकर, उद्योजक सुगंध दाभाडे, उद्योजक भीमरत्न कांबळे, महेंद्र तायडे, अण्णा जाधव, ज्ञानशील वाघमारे, अरविंद पवार, संघपाल इंगोले, राजू मोरे, संतोष दळे, सुनील जोगदंड, शशिकांत गोफने, सूरज मनोहर, दत्ता मनोहर, अशोक वाहुळ, बबन बनसोडे, रजनीकांत त्रिभुवन, राहुल जाधव, राहुल बनसोडे, अरुण रूपेकर, मोहन इंगोले, अभिषेक दाभाडे आदींची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news