Sambhajinagar Robbery : सिडकोत घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

एन-५ भागातील घटना; लातूरला गेले होते कुटुंब
Robbery
RobberyPudhari
Published on
Updated on

Valuables worth ₹2.5 lakh stolen after house in CIDCO is broken into

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुटुंबीयांसह बाहेरगावी गेलेल्या तरुणाचे घर फोडून चोरट्याने रोख रक्कमेसह सोने-चांदीचे दागिने असा २ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना सिडको एन-५ भागातील गुलमोहर कॉलनीमध्ये १३ ते १५ जूनदरम्यान घडली. या प्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Robbery
Chhatrapati Sambhajinagar Theft : सिडकोत धुमाकूळ; व्यापाऱ्याचे घर फोडून लाखोंचा ऐवज लंपास

फिर्यादी आशिष सारंगधर पवार (३१, रा. एन ५, ई ४२, गुलमोहर कॉलनी, जिजामाता शाळेच्या बाजूला, सिडको) हे खाजगी नोकरी करतात. १३ जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आशिष पवार हे आपल्या कुटुंबासह लातूर येथील त्यांच्या मूळ गावी गेले होते.

दोन दिवस गावी राहिल्यानंतर १५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ते कुटुंबासह घरी परतले. त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. आत जाऊन पाहिले असता, सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते.

Robbery
Jalna house burglary: राजस्थानला गेलेल्या व्यापाऱ्याचे घर फोडले

तसेच, बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेली १ लाख २५ हजार रुपयांची रोख रक्कम, १ तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र, ७० भार चांदी (चांदीचे कडवाळे, ब्रेसलेट, कमरेचा छल्ला, कुहेरी, जोडवी, चैन, शिक्के, अंगठी, स्टोन) लंपास केल्याचे निदर्शनास आले. गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार भानुदास खिल्लारे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news