

चंद्रकांत अंबिलवादे
पैठण : पैठण शहरालगत असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सापडला आहे. मृतदेह पोत्यामध्ये बांधून पाण्यामध्ये टाकल्याचे आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, सपोनि सी.पी पवार, उपनिरीक्षक प्रमोद यादव, सफौ सुधीर ओहोळ, पोलीस हवालदार नरेंद्र अंधारे मुज्जू पठाण, भाऊसाहेब तांबे या पोलीस पथकाने शासकीय पंचाच्या उपस्थितीत सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाहणी केला.
चौकशीमध्ये या मृतदेहाचे वय साधारण ५० वर्षे असल्याचे समजते. तसेच या व्यक्तीचा खून पूर्ववैमनस्यातून करून सदरील मृतदेह पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने गोदावरीच्या वाहत्या पाण्यात पोत्यात बांधून आणून टाकल्याचा अंदाज पैठण पोलिसांनी व्यक्त केला आहे.