

Paithan Farmers Rally
पैठण : शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडवून महायुती सरकारमधील मंत्री, खासदार आमदार स्वतःचा भलं करण्यासाठी दंग झाले आहेत. सरकारच्या पोकळ आश्वासनांनी बळीराजाच्या हातात काहीही राहिलेले नाही, अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणाने उभी राहणार असल्याची ग्वाही ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख व माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली
पैठण तालुक्यातील नांदर येथे बुधवारी (दि.५) आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. महायुती सरकारने शेतकऱ्यांना नुसती पोकळ आश्वासने दिली आहेत. पण प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे शिवसेना खंबीरपणाने उभी राहणार आहे.
याप्रसंगी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, दत्ता गोर्डे, मनोज पेरे, राजू परदेशी, सोमनाथ जाधव, राखी परदेशी, किशोर वैद्य, अजय परळकर, कल्याण मगरे, स्वाती माने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी ग्रामीण भागातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी, नागरिकांनी महायुती सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याच्या भावना व्यक्त केल्या. पैठण येथील नाथसागर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीचे नियोजन करून पाणी सोडले. त्यामुळे पैठण शहरातील पुराची चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.